“प्रेमी युगुलाला मारहाणीची घटना महाराष्ट्राला काळीमा फासणारी”

मुंबई | एका प्रेमी युगुलाला मारहाण करतानाचा व्हीडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय. हा व्हीडिओ जालन्यातला असल्याचं समोर येतंय. या व्हीडिओमध्ये मुलीचा विनयभंग होत असल्याचं दिसतंय. चार जणांच्या टोळक्याने त्या प्रेमी युगुलाला मारहाण करत मुलीचा विनयभंग केलाय. त्यामुळे मुलींचीं सुरक्षितता आणि त्यांच्यासाठी निर्भय वातावरण या चर्चा केवळ चर्चाच बनून राहिल्याचं पुन्हा सिद्ध झालंय. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भातच ट्वीट करून आपला संताप व्यक्त केला आहे.

जालना येथे काहीजणांनी एका मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. अशा प्रकारचे ‘मॉरल पोलिसींग’करण्याचा अधिकार कुणालाही नाही. त्या मुलीची प्रायव्हसी आपण जपलीच पाहिजे. ही घटना महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे, असं त्या म्हटल्या आहेत.

माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की, या घटनेचा व्हिडिओ आपण कुणालाही फॉरवर्ड करु नये. आपल्याकडे तो आला असेल तर तो डिलिट करावा. मी स्वतः गृहखाते व सायबर क्राईम सेलला हा व्हिडीओ डिलिट करावा अशी विनंती केली आहे, असंही त्यांनी सांगितलंय.

दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हीडिओची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून संबंधितांवर योग्य ती कारवाई करणार असल्याचं आश्वासन जालना पोलिस अधिक्षकांनी दिलं आहे.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-फडणवीसांच्या आणखी एका महत्त्वकांक्षी योजनेला ठाकरे सरकारचा ब्रेक?; भाजपला धक्का

-अर्थव्यवस्थेवरून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची केंद्र सरकारवर सडकून टीका