पुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी औरंगाबादमध्ये झालेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर सडकून टीका केली. यावर राष्ट्रवादीच्या नेत्या सुरखे पुणेकर यांनी प्रतिक्रिया देत राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
राज ठाकरे हे चौरंगी चिरा आहेत. त्यांनी व्यवस्थित राजकारण करायला हवं. राज ठाकरेंनी आता कुठे तरी थांबायला हवं, असं म्हणत सुरेखा पुणेकर यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
राज ठाकरेंचं राजकारणात काहीच आस्तिव राहिलं नसल्याने ते चिडून पवारसाहेबांवर (Sharad Pawar) खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत, असं सुरेखा पुणेकर यांनी म्हटलंय.
पवारसाहेबांवर खालच्या पातळीवर टीका करणंही राज ठाकरेंना शोभत नसल्याची बोचरी टीका सुरेखा पुणेकरांनी केली आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी शरद पवार हे जाती-जातींमध्ये भेद निर्माण करतायत ते पुस्तक वातचना सुद्धा लेखक कोणत्या जातीचा आहे बघतात. तसंच आपण बोलल्यापासूनच ते राष्ट्रवादींच्या सभांमधून शिवाजी महाराजांचे नावं घ्यायला सुरुवात झाली, असं म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या-
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून अलर्ट जारी
पुतिन यांना झालाय गंभीर आजार; तब्येतीमुळे ‘हा’ मोठा निर्णय घेणार?
8 जागतिक नेत्यांसोबत 65 तास, 25 बैठका; नरेंद्र मोदी युरोप दौऱ्यासाठी रवाना
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र रूग्णालयात दाखल, प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर
‘भोंगे उतरवण्याने…’; राज ठाकरेंच्या भाषणानंतर आनंद दवेंचं मोठं वक्तव्य