‘या’ व्यक्तीविषयी मला आदर नाही आणि यापुढेही नसेल- सुरेखा पुणेकर

पुणे : कलर्स मराठी वाहिनीवर ‘बीग बॉस’ सीझन दोनमधून बाहेर पडल्यानंतर लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरने अभिनेत्री किशोरी शहाणेवर सडकून टीका केली आहे.

किशोरी शहाणेबद्दल मला आदर नाही आणि यापुढेही नसेल. ती पण लवकरच बीग बॉसमधून बाहेर पडेल, असं रोखठोक वक्तव्य सुरेखा पुणेकर यांनी केलं आहे. 

किशोरी शहाणे ही माझ्यावर जळत होती. बाकीचे कलाकार मला आदर देत होते तेव्हा ती माझ्यावर जळत असायची, असा आरोप सुरेखा पुणेकरने किशोरी शहाणेवर केला आहे. त्या एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या. 

सुरेखा पुणेकर यांनी आता विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पुणे, मोहोळ आणि नांदेड या मतदारसंघातूून त्या निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 

निवडणुकीसाठी अनेक पक्षांकडून प्रस्ताव आला आहे. मात्र पक्ष आणखी ठरवलेला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.