“ममता बॅनर्जी सांभाळून बोला, नाहीतर तुमचाही चिदंबरम करू”

लखनऊ :  ममता बॅनर्जी यांनी पायरी सांभाळून बोलावं अन्यथा त्यांची गत सध्या तिहार तुरुंगात असलेले माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांच्यासारखी करून टाकू, असा इशारा भाजपचे उत्तर प्रदेशातील आमदार सुरेंद्र सिंह यांनी दिला आहे.

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीला ममता बॅनर्जी यांचा विरोध असल्याने सुरेंद्र सिंह यांनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे.

सुरंद्र सिंह हे बैरियाचे आमदार असून त्यांनी तृणमूलच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना बांगलादेशचे पंतप्रधान व्हा, असा सल्ला दिला.

ममता बॅनर्जी यांनी जी वक्तव्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीबाबत केली आहेत त्यावरून त्यांना परकीय शक्तींचा पाठिंबा असल्याचं दिसत आहे, असं सुरेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे.

ममता बॅनर्जी यांना त्यांचे वाईट दिवस जवळ येत चालल्याचा विसर पडलेला दिसतो. त्यांनी  भाषा आणि वर्तन बदलावं नाहीतर  त्यांची गत पी.चिदंबरम यांच्यासारखी करू, असं सिंह यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-