तुझ्या भीक माग्या देशासाठी काहीतरी कर; ‘या’ भारतीय क्रिकेटपटूचा आफ्रिदीला कडक सल्ला

नवी दिल्ली | पाकव्याप्त काश्मीर खोऱ्यात गरजूंना मदत करण्यासाठी पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी गेला होता. मात्र तेथे गेल्यावर भारतीयांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय. यावरून भारताचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनानं अफ्रिदीवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

सर्व लोकांनी त्यांच्या कामाशी संबंधित बोलायला हवं. विशेषतः जो देश भीक मागून जगत आहे त्यांनी. त्यामुळे तुमच्या अपयशी देशासाठी काहीतरी करा आणि काश्मीरचा मुद्दा सोडून द्या. काश्मिरी असल्याचा मला अभिमान आहे आणि तो नेहमी भारताचा अविभाज्य घटक राहील, असं म्हणत सुरेश रैनानं अफ्रिदीला फटकारलं आहे.

कोरोनापेक्षा मोठा रोग मोदी यांच्या मनात आणि डोक्यात आहे. तो आजार धर्माचा आहे. त्या आजारावर ते सत्ता चालवत आहेत. आमच्या काश्मिरी लोकांवर अत्याचार करत आहे याचे उत्तर त्यांना द्यावंच लागेल, असं अफ्रिदीने म्हटलं होतं.

दरम्यान, भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर, युवराज सिंग, हरभजन सिंग आणि शिखर धवन यांनी देखील आफ्रिदीला चांगलंच खडसावलं.

 

महत्वाच्या बातम्या-

-… तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपला गणवेश बदलावा लागला नसता- अनुराग कश्यप

-आफ्रिदी गेला खड्ड्यात, देशासाठी मी बंदूक उचलेन- हरभजन सिंग

-महाराष्ट्राच्या साहित्य विश्वातील अमुल्य साहित्य ‘रत्न’ निखळलं; मुख्यमंत्र्यांची मतकरींना आदरांजली

-तज्ज्ञ अहवाल आता आवरा आणि इशाऱ्यांचे नगारे देणे थांबवा; संजय राऊत संतापले

-जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांना संजय राऊत यांचा सल्ला, म्हणाले…