आश्चर्यम! तीन पुरुषी लिंगांसह जन्माला आलं बाळ, जगभरातील डॉक्टर्स हैराण

बगदाद | जगभरात रोज लाखो मुलं जन्माला येतात. जन्माला आल्यानंतर यातील बरीच मुलं ही नॉर्मल असतात. मात्र, काही मुलांमध्ये जन्मतःच व्यंग आढळतात. काहीतरी व्यंगांबरोबर जन्माला येणाऱ्या मुलांची संख्या अगदी नगण्य असते. सध्या अशीच एक दुर्मिळ घटना इराकमध्ये घडली आहे.

इराकमध्ये एक बाळ चक्क तीन पेनिससह जन्माला आलं आहे. यामुळे संपूर्ण जगाने आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसेच हे जगातील पहिलंच दुर्मिळ प्रकरण असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. या दुर्मिळ घटनेमुळे जगभरातील डॉक्टर्स हैराण झाले आहेत.

इराकच्या मोसुल शहरात राहणाऱ्या एका जोडप्याच्या मुलाला जन्माच्या काही दिवसांनंतर लघवीच्या जागी सूज येत होती. यामुळे हे जोडपं आपल्या मुलाला डॉक्टरांकडे घेऊन गेलं. मात्र डॉक्टरांकडे गेल्यानंतर अतिशय धक्कादायक माहिती समोर आली.

डॉक्टरांनी त्या मुलाची तपासणी आणि काही महत्वाच्या वैद्यकीय चाचण्या केल्या. तर डॉक्टरांना हैराण करून सोडणारा अहवाल समोर आला. या मुलाच्या मुख्य लिंगाला जोडून आणखी दोन लिंग होती. एक लिंग मुख्य लिंगाच्या शेजारी होतं. याची लांबी 2 सेमी होती. तर दुसरं लिंग मुख्य लिंगाच्या खाली होतं. याची लांबी 1 सेमी होती.

बाळाच्या या तीन लिंगांपैकी केवळ एकंच लिंग काम करत होतं. म्हणजे केवळ मुख्य लिंगताच मूत्रमार्ग होता. इतर दोन लिंगांमध्ये मूत्रमार्ग नव्हता. यानंतर अनेक सर्जन्सच्या सल्ल्यानुसार अतिरिक्त दोन लिंग ऑपरेशन करून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.

बाळाच्या जन्माच्या तीन महिन्यानंतर डॉक्टरांनी ऑपरेशन काढून हे अतिरिक्त लिंग काढून टाकले. या बाळाचे ऑपरेशन होऊन सध्या वर्ष पूर्ण झालं आहे. मात्र, अद्याप तरी या बाळाला पुन्हा कोणती समस्या उद्भवली नाही.

डॉ. शाकीर सलीम यांनी याबद्दल इंटरनॅशनल जर्नल ऑफ सर्जरीमध्ये माहिती दिली आहे. या प्रकरणाबद्दल सांगताना डॉ. शाकिर सलीम यांनी लिहिलं आहे की, तीन लिंग असलेलं बाळ जन्माला येणं याला ट्रिपहेलिया म्हटलं जातं. तीन लिंग असणं म्हणजे ट्रिपहेलियाचं हे पहिलंच प्रकरण आहे.

बाळाला अनुवंशिकपणे अशी समस्या आली नाही. कारण त्याचा कौटुंबिक इतिहासही तपासण्यात आला आहे. त्याच्या कुटुंबामध्ये यापूर्वी असा आजार कोणालाही नव्हता. त्यामुळे बाळ जेव्हा गर्भात होतं. तेव्हाच काहीतरी समस्या झाली असावी, असं डॉक्टर शाकिर सलीम यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या – 

झूम मिटींगमध्ये ‘या’ बड्या राजकीय नेत्याची पत्नी नग्नावस्थेत दिसल्यानं गदारोळ; व्हिडीओ व्हायरल

‘आठ वर्ष रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर सलमाननं मला फसवलं’, ‘या’ अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

बाॅलिवूडला मोठा धक्का! ‘या’ प्रसिद्ध…

जाणून घ्या! पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत आज काय बदल झाले?

शिवपार्वतीच्या आशिर्वादाने ‘या’ राशीच्या लोकांचा…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy