“रामदास कदमांनी महाराष्ट्रात कुठेही फिरावे, त्यांच्या…” शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचे थेट आव्हान

मुंबई | शिवसेनेचे एकेकाळचे विरोधी पक्षनेते आणि ज्येष्ठ आमदार रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी शिंदे यांच्या बंडात सहभाग घेतला. त्यानंतर त्यांनी शिंदे यांच्या बाजूने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीकांचा पाऊस सुरु केला.

तीन दिवसांपूर्वी दापोली येथे एक सभा घेण्यात आली. या सभेला संबोधित करताना रामदास कदमांची जीभ घसरली. त्यांनी खालच्या भाषेत आणि आक्षेपार्ह शब्दांत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.

त्यामुळे शिवसेना भलतीच आक्रमक झाली होती. शिवसेनेच्या वतीने आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी रामदास कदमांचा समाचार घेतला आणि त्यांना त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले.

पण हा वाद अद्याप संपला नाही. नुकत्याच शिवसेनेत सामील झालेल्या आंबेडकरी चळवळीच्या नेत्या, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी रामदास कदम यांना आव्हान केले आहे.

रामदास कदमांनी महाराष्ट्रात कुठेही फिरावे, शिवसेना त्यांना उत्तर देईल, असा इशाराच सुषमा अंधारे यांनी दिला आहे. रामदास कदम यांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे, असे अंधारे म्हणाल्या.

एका मराठी वृत्त वाहिनीसोबत बोलताना अंधारे म्हणाल्या, रामदास कदम यांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांनी धसका घेतला आहे.

जे दुसऱ्यांना शिल्लक सेना म्हणतात ते मुळात कफल्लक लोक आहेत. त्यांच्याकडे इमानदारी नाही. ते मिंधे आहेत. हे शिंदे सेनेतील नव्हे, तर मिंधे सेनेतील लोक आहे, असे देखील अंधारे म्हणाल्या.

मातोश्रीने रामदास कदम आणि त्यांच्यासोबतच्या गद्दारांना अत्यंत प्रमाणे सांभाळले. त्यांना मातोश्रीने कधीही उपाशी पोटी बाहेर पडू दिले नाही. मिनाताई ठाकरेंनी काळजीने त्यांची सरबराई केली. त्यांच्याच चारित्र्यावर आता हे लोक शिंतोडे उडवीत आहेत, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या – 

शरद पवारांची पत्राचाळ घोटाळ्यात चौकशी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

पत्राचाळ घोटाळ्याचे धागेदोरे शरद पवारांपर्यंत? भातखळकरांची चौकशीची मागणी

रामदास कदमांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “कोणी दाढी…”

मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी! मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

मनसेची शिवसेनेवर मोठी टीका; “शिवसेनेला दसरा मेळाव्याला परवानगी द्या, नाहीतर जनता…”