Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

सुशांत प्रकरणी आदित्य ठाकरेंवर आरोप करणारा ‘तो’ व्यक्ती गजाआड

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्यूच्या बातमीने संपूर्ण देशाला धक्का बसला होता. सुशांतच्या मृ.त्यूला चार महिने उलटून गेले तरी अद्याप देखील याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्यूनंतर अनेकांवर आरोप लावण्यात आले होते. बॉलिवूड इंडस्ट्रीसह महाविकास आघाडीच्या सरकार मधील अनेक नेत्यांवर देखील बरेच आरोप करण्यात आले होते.

सुशांत प्रकरणी शिवसेना नेते आणि महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव देखील अनेकवेळा समोर आलं आहे. अनेकांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. दिल्लीतील एका वकिलाने देखील आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला होता. मात्र, त्या वकिलाला त्याचं वक्तव्य चांगलंच महागात पडलं आहे.

दिल्लीतील वकील विभोर आनंद याला मुंबईच्या सायबर शाखेनं अ.टक केली आहे. सुशांत प्रकरणी विभोर आनंद याने आदित्य ठाकरेंवर अनेक खोटे आरोप केले होते. महाराष्ट्राच्या एका बड्या मंत्र्यांवर खोटे आरोप केल्यानं विभोर अनांद याला मुंबईच्या सायबर शाखेनं ता.ब्यात घेतलं आहे.

विभोर आनंद याने महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांची नावे घेत त्यांच्यावर आरोप केले होते. सुशांतच्या मृ.त्यूपूर्वी सुशांतची पूर्व मॅनेजर दिशा सॅलियनचा मृ.त्यू झाला होता. दिशाच्या मृ.त्यू प्रकरणी विभोर आनंदने आदित्य ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर देखील निशाणा साधला होता.

विभोर आनंद याने आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांचा संबंध जोडणारा एक व्हिडिओ यु ट्यूबवर पोस्ट केला होता. तसेच दिशा सॅलीयनच्या मृ.त्यूपूर्वी तिच्यावर सामूहिक ब.लात्का.र करण्यात आला होता, असंही विभोरनं म्हटलं होतं.

मुंबई पोलिसांनी विभोर आनंदला दिल्लीतून ता.ब्यात घेतलं आहे. विभोरला दिल्लीत अ.टक केल्यानंतर गुरुवारी त्याला मुंबईत आणलं गेलं. विभोरला न्यायालयानं 19 ऑक्टोबर पर्यंत पोलीस को.ठडी सुनावली आहे.

यापूर्वी न्यायालयानं विभोरला सोशल मीडियावर खोटे आरोप आणि भडकावू पोस्ट शेअर न करण्याची सूचना दिली होती. तरी देखील विभोर आनंद सुशांत प्रकरणी वाटेल तशा पोस्ट लिहीत होता. यामुळे पोलिसांनी विभोरला सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरवणे आणि विद्वेषक पोस्ट करणे, या गु.न्ह्याखाली अ.टक केली आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय याप्रकरणी शोध घेत होती. मात्र, सीबीआयला सुशांत प्रकरणात कोणत्याही प्रकारची हेरागिरी न आढळल्यानं सीबीआयनं सुशांतनं आ.त्मह.त्याच केली आहे, हे स्पष्ट केलं आहे. यामुळे लवकरच सुशांत प्रकरण बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कंगना आणि भाजपचा संबंध आहे का? ‘या’ नेत्यानं दिली महत्वाची माहिती

ख्रिस गेलने टी-20 मध्ये चौकार आणि षटकार मारून रचला ‘हा’ नवा विक्रम!

‘या’ ठिकाणी रोज 2 तास मिळते केवळ एक रुपयात पोटभर जेवण!

उपमुख्यमंत्री अजित पवार ‘त्या’ प्रकरणी अडकणार? ईडीची मोठी कारवाई

अखेर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या मुहूर्तावर सोडलं मौन म्हणाले…