मुंबई | बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अनेक नवनविन खुलासे समोर येत आहेत. सुशांत सिंहच्या मृत्यूप्रकरणी मुंबई आणि बिहार पोलीस तपास करत होते. मात्र, हा तपास आता सीबीआयकडे सोपविण्यात आला आहे. सीबीआयकडून सुशांतशी जोडल्या गेलेल्या अनेकांची चौकशी केली जात आहे. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचीही सीबीआय कसून चौकशी करत आहे.
रिया चक्रवर्तीने या अगोदर मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबात सुशांतच्या आयुष्यातील एका धक्कादायक घटनेचा खुलासा केला होता. सुशांतला इटलीतील एका हॉटेलमध्ये भूत दिसल्याची कहाणी रियाने मुंबई पोलिसांना सांगितली होती.
सुशांत, मी आणि शोविक युरोप टूरला गेलो होतो. यावेळी आम्ही इटलीतील फ्लोरेन्स शहरातील 600 वर्ष जुन्या हॉटेलमध्ये थांबलो होतो. शोविक आणि मी काही कामानिमित्त बाहेर गेलो होतो. काही तासात आम्ही हॉटेलमध्ये परतलो. मात्र, सुशांत हॉटेलमध्ये एका कोपऱ्यात रुद्राक्षाची माळ जपत बसला होता. यावेळी तो खूप घाबरला होता. मी आणि शोविकने सुशांतला काय झालं विचारलं असता त्याने धक्कादायक घटना सांगितली.
सुशांत हॉटेलमधल्या गोया नावाच्या चित्रकाराची पेंटिंग पाहून खूप घाबरला होता. या पेंटींगमधला राक्षस सुशांतला बोलवत असल्याचं त्यानं सांगितलं. मात्र, सुशांतची तब्येत बिघडू लागल्याने आम्ही मुंबईला परतलो, असा खुलासा रियाने केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
मराठमोळे दिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्रकृती गंभीर, चाहते चिंताग्रस्त
बॉलिवूडमधून धक्कादायक बातमी; संजू बाबूला कोरोना नाही पण झालाय ‘हा’ गंभीर आजार
सुशांतचे पोस्टमोर्टम रिपोर्ट आम्हाला दिले नाहीत…; बिहार सरकारचे मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप
पती अन् सासू सासऱ्यानेच रचला तिच्या मृत्यूचा कट; कारण ऐकूण व्हाल हैराण!
मुंबई हादरली! धावत्या कारमध्येच अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार