सुशांतच्या दोषींना सोडणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा शब्द

मुंबई | अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये घराणेशाहीच्या मुद्द्यावर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. यावरून अनेक अभिनेत्यांना ट्रोलही करण्यात आलं. या प्रकरणी आता जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. तसंच यामध्ये कोणी दोषी आढळलं तर त्यांना सोडणार नाही, असं आश्वासन चिराग पासवान यांनी दिलं आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमधील घराणेशाहीच्या मुद्द्यावर बिहारमधील लोकांच्या मनात प्रचंड राग आहे. त्यामुळे या प्रकरणाबाबत सर्व प्रकारची मदत करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणी चिराग पासवान यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रंही पाठवलं आहे. मी गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे. सुशांतच्या आत्महत्येला बॉलिवूडमधील गटबाजी जबाबदार असल्याचं सगळ्यांचा आरोप आहे असं चिराग पासवान यांनी पत्रात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘या’ महत्त्वाच्या मुद्द्यांसाठी अमित ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट