रिपोर्टरनं सुशांतच्या फार्महाऊस मॅनेजरला बोलतं केलं, त्यानंतर त्यानं केले अत्यंत धक्कादायक खुलासे!

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहे. आता रिपब्लिक टीव्हीने सुशांतच्या लोणावळ्याच्या फार्म हाऊसवर जाऊन त्याच्या येथील माजी मॅनेजरची मुलाखत घेतली आहे. रईस असं या मॅनेजरचं नाव आहे, त्याने या मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. यातील काही धक्कादायक खुलासे अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाबद्दल आहेत.

रिया चक्रवर्ती सुशांतच्या आयुष्यात आल्यापासून त्याने जगणं सोडून दिलं होतं. काही प्रमाणात रियाने त्याचं आयुष्य कंट्रोल करण्यास सुरुवात केली होती. सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा सुशांतपेक्षा रियाचं जास्त ऐकत होता, असा धक्कादायक खुलासा रईसने केला आहे. रियाचं कुटुंब कशाप्रकारे सुशांतच्या पैशावर त्याच्या फार्म हाऊसवर पार्ट्या करायचं आणि रियाच्या खर्चावरुन सुशांत कसा तिच्यावर भडकला होता, याबद्दलही त्यानं सांगितलं आहे.

रईसने सांगितल्यानूसार, मुंबईच्या ज्या घरात सुशांतचा मृ.त्यू झाला ते घर सुशांतला अजिबात आवडत नव्हतं. या घरावरुन रिया तसेच त्याची मॅनेजर श्रुती मोदीसोबत त्याचं भां.डण झालं होतं. रइसने दावा केल्यानूसार, श्रुती ही रियाची जा.सूस होती. रिया करत असलेली ऐशोआराम ती त्याच्यापासून लपवण्याचं काम करत होती. मला मुंबईच्या सुशांतच्या स्टाफने सांगितलं होतं की कशाप्रकारे सुशांत खाली झोपायचा व रिया व त्याचे कुटुंब आपल्या मित्रांसोबत वर टेरेसवर पार्ट्या करायचे. तसेच रियाचा भाऊ शौविक न.शेत असायचा, असं रईसनं सांगितलं आहे.

डिसेंबर-जानेवारी पासूनच रिया आणि सुशांतच्या नात्यात दुरावा आला होता. दोघांनी एक घर देखील खरेदी केलं होतं, मात्र दोघांमध्ये निर्माण झालेल्या दुराव्यामुळे त्यांनी ते एकाच वर्षात खाली केलं. रिया आयुष्यात आल्यापासून सुशांतचं आयुष्य बदलून गेलं होतं. त्यानं आयुष्य एन्जॉय करणं सोडलं होतं, असंही रईसने सांगितलं. दरम्यान, सुशांतसिंग राजपूत प्रकरणात CBIने रईसची चौकशी केली होती. तर याच प्रकरणात ड्र.ग्ज अँगल समोर आल्यानंतर NCBने या प्रकरणाचा तपास करण्यात सुरुवात केली आणि रियासोबत तिचा भाऊ शौविकला अट.क केली आहे. त्यांच्यावर कथित ड्र.ग्ज खरेदी केल्याचा, विकल्याचा व सेवन केल्याचा आरोप आहे.

AIIMSनं दिली महत्त्वाची माहिती-

सुशांतसिंग प्रकरणात फॉ.रेंसिंग टीमचं नेतृत्व करणाऱ्या एम्सच्या फॉ.रेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी गुरुवारी सांगितलं, की मेडिकल बोर्डाचा अहवाल पुढील आठवड्यात सीबीआयला दिला जाईल. एएनआयशी बोलताना ते म्हणाले, की मला आशा आहे की बोर्डाने दिलेला अहवाल निर्णायक असेल. अहवाल इतर कुणाशीही शेअर केला जाऊ शकत नाही कारण सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

दिशाच्या शरीरावर दोन…; फॉ.रेन्सिक एक्सपर्टनं केला अत्यंत धक्कादायक दावा

आई-बापानं 14व्या वर्षीच करुन दिलं लग्न; त्यानंतर जे घडलं ते अत्यंत धक्कादायक

सुशांतच्या फार्महाऊसवर सापडल्या महत्त्वाच्या नोट्स; वाचा यात नेमकं काय लिहिलंय!

सुशांत प्रकरणी मोठी बातमी! शौविकनं ‘या’ व्यक्तीसोबत शेअर केले होते ड्र.ग्जचे फोटो