Top news मनोरंजन

पवना डॅमवर झिंगाट पार्ट्या, सुशांत ‘या’ अभिनेत्र्यांना घेऊन यायचा; बोटचालकांची माहिती

मुंबई | अभिनेता सुशांतसिंग प्रकरणी रोज नवनवे खुलासे होत आहेत. यातील अनेक खुलासे धक्कादायक तर आहेतच मात्र या खुलाश्यांमुळे कोणी ना कोणी अडचणीत सापडत आहे. आताही एक नवा खुलासा समोर आला आहे आणि बॉलिवूडच्या काही प्रसिद्ध अभिनेत्रींची नावं यामध्ये समोर आली आहेत. या अभिनेत्र्या सुशांतसोबत पवना डॅमवर पार्ट्यांना जात असल्याचं समोर आलं आहे.

ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला यासंदर्भात एक महत्त्वाची माहिती मिळाली आहे. पवना डॅम येथील बोट चालक जगदीश दासने यासंदर्भात महत्त्वाची माहिती ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला दिली आहे. पवना डॅम जवळ असलेल्या सुशांतच्या फार्महाऊसवर या पार्ट्या व्हायच्या. या पार्ट्यांना आतापर्यंत रिया चक्रवर्ती, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांनी हजेरी लावली असल्याचं त्यानं सांगितल्याचं कळतंय.

सुशांतसिंग प्रकरणातील ड्र.ग्ज प्रकरणाचा तपास करत असलेल्या ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला अनेक महत्त्वाच्या माहित्या हाती लागत आहेत. पवना डॅम जवळ असलेल्या सुशांतच्या फार्महाऊसवर सुशांत नेहमी जायचा. पवना डॅमजवळच्या एका बेटावर हे फार्म हाऊस असल्याची माहिती आहे. तिथं गेल्यावर सुशांत कधी कधी बोटिंग करायचा.

जगदीश दास असं पवना डॅम येथे मोटारबोट चालवणाऱ्याचं नाव आहे, तो 2011 सालापासून इथं हे काम करत आहे. 2018 मध्ये अब्बास आणि रमजान अलीने जगदीशला फोन केला होता. तेव्हा त्यांनी जगदीशला सांगितलं की, पवना डॅम फिरायचा आहे. त्यासाठी त्याला जरीन खानच्या बंगल्यावर बोलवण्यात आलं होतं.

जगदीशनं सांगितल्यानूसार, सुशांतसिंह राजपूत आणि अब्बास अली माझ्या बोटवर आले होते. डॅमच्या मधोमध गेल्यानंतर त्यांनी बोट थांबवली आणि बोटीतून उड्या मारुन ते पोहायला लागले. पोहून झाल्यानंतर ते पुन्हा बोटीत आले, मी त्या दोघांना पुन्हा परत घेऊन आलो.

जगदीशनं केलेल्या या कामासाठी त्यांनी त्याला काही पैसे दिले. मला 16 हजार रुपये रोख रक्कम दिली होती. त्यानंतर मात्र ते अधेमध्ये वेळ काढून पवना डॅमला यायचे आणि वेळ मिळेल तेव्हा बोटिंग करायचे आणि आपती गवंडे टापुवर जाऊन तासन्तास बसायचे, असं जगदीशनं सांगितलं आहे.

जगदीश दासने एनसीबीला दिलेल्या माहिती प्रमाणे सारा अली खान, रिया चक्रवर्ती आणि श्रद्धा कपूर देखील येथे फिरायला आल्या होत्या, मात्र ते एकत्र कधीच आले नाहीत. कधी-कधी रिया आणि सुशांत तासन्तास टापूवर बसायचे, तर एकदा श्रद्धा कपूरसुद्धा सुशांतसोबत याठिकाणी आली होती, अशी माहिती जगदीशनं दिली आहे. या प्रकरणात आतापर्यंत श्रद्धाचं नाव आलं नव्हतं. मात्र आता तिचं नाव नव्यानं समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.

दुसरीकडे सारा अली खान तीन ते चार वेळा सुशांतसोबत माझ्या बोटीवर आली होती, असं जगदीशनं म्हटलं आहे. त्यांनी टापूवर जाऊन पार्टी केल्याची माहितीसुद्धा जगदीशने एनसीबीला दिली आहे.

जगदीशच्या या खुलाशानं पवना डॅम परिसरात सेलिब्रेटींच्या पार्ट्या होत असल्याचं समोर आल्या आहेत. या पार्ट्या साध्यासुध्या नाहीत तर दा.रु आणि ड्र.ग्जचा यामध्ये बेसुमार वापर होत होता.

सुशांतच्या पार्ट्यांमध्ये सारा अली खान, सिद्धार्थ पीठानी, दीपेश सावंत, सॅम्युअल मिरांडा, रिया चक्रवर्ती, श्रद्धा कपूर या सर्वांचा समावेश होता. ही लोक तासन्तास टापूवर बसून दा.रू प्यायची, गां.जा ओढायची आणि पूर्ण पणे न.शेच्या आहरी जायची.

दुसरीकडे त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल देखील जगदीशला माहिती विचारण्यात आली होती. मात्र आपल्याला त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल काहीही माहिती नसल्याचं जगदीश दासने एनसीबीला सांगितलं आहे.

आता जगदीश दासच्या खुलाश्यामुळे सिनेजगतात चांगलीच खळबळ उडाली आहे. ज्या कलाकारांची नावे आता एनसीबीच्या चौकशीमध्ये समोर आली आहेत. त्यांना चौकशीसाठी एनसीबीकडून नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात या कलाकारांची चौकशी झाली तर आणखी माहिती समोर येऊ शकते. सुशांतसिंग प्रकरणात काही महत्त्वाची माहिती मिळते का या दृष्टीने तपास सुरु आहे. त्यात एनसीबीनं जोरदार चौकशी सुरु केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

ड्र.ग्ज पार्टी केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार; ‘या’ सात बड्या कलाकारांची नावं गोत्यात!

दिशाचा मित्र गायब आहे का?; सेक्युरिटी गार्डनं केला मोठा खुलासा

अंकिता लोखंडेवर भडकले चाहते; ‘या’ कारणामुळे सोशल मीडियावर जोरदार ट्रोल!

संबित पात्रांनी विचारला POK चा फुलफॉर्म; ‘या’ अभिनेत्रीला देता आलं नाही उत्तर!

सुशांत प्रकरणी शौविकनं अखेर मौन सोडलं; ‘या’ व्यक्तींच्या नावाचा खुलासा करत दिली महत्वाची माहिती