सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी ‘या’ चार जणांविरोधात पोलिसात तक्रार दाखल

मुंबई | अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी निर्माते-दिग्दर्शक करण जोहर, संजय लीला भन्साळी, अभिनेता सलमान खान आणि निर्माती एकता कपूर यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सुशांतला 7 चित्रपटांमधून काढून टाकलं गेलं होतं आणि त्यामुळेच त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडलं गेलं, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. वेगवेगळ्या चित्रपटांच्या निर्मितीची जबाबदारी करण जोहर, संजय लीला भन्साळी, सलमान खान आणि एकता कपूर यांच्याकडे होती.

सुशांतच्या आत्महत्येनंतर कंगना राणावत, विवेक ओबेरॉय, अभिनव कश्यप, अनुभव सिंह यांच्यासह सर्वसामान्य चाहत्यांनीही ट्विटरवर करण जोहर, सलमान खान यांच्याविरोधात टीकेची झोड उठवली होती.

सुशांतसिंह राजपूत याची एक्स गर्लफ्रेण्ड आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे सुशांतच्या वडिलांना भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली होती. यावेळी पोलिसांनी तिच्याकडेही जुजबी चौकशी केल्याची माहिती आहे.

महत्वाच्या बातम्या-

-या संकट काळात काँग्रेस पक्ष सरकारला पूर्णपणे सहकार्य करेल पण…- सोनिया गांधी

-“महाराष्ट्राला आणि पर्यावरणाला वाचवायला माळकरी आणि वारकरीच पुरेसे आहेत”

-“एकुलत्या एक पुत्राने देशासाठी प्राणार्पण केल्याचा आम्हाला अभिमान”

-“सीमेवर जे घडलं, त्यासाठी नेहरू, इंदिरा गांधींना किंवा राहुल गांधींना जबाबदार धरू शकत नाही”

-‘तिथल्या तिथे लगेच उत्तर द्या’; केंद्र सरकारने भारतीय लष्कराला दिले विशेषाधिकार