सुशांतच्या आत्महत्येने शेन वॉटसनही गहिवरला, म्हणाला….

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या मृत्यूनंतर देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. CSK चा धडाकेबाज फलंदाज शेन वॉटसनदेखील सुशांतच्या मृत्यूची घटना ऐकून गहिवरला आहे.

सुशांतबद्दल विचार करणं मला थांबवताच येत नाहीये, असं शेन वॉटसनने म्हटलं आहे. त्याने ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

धोनीच्या चित्रपटाच त्याचा अभिनय पाहताना असा प्रश्न पडायचा की हा सुशांत आहे की स्वत: धोनीच आहे. धोनीची भूमिका सुशांतने अत्यंत चांगल्या पद्धतीने केली, असं शेन वॉटसन म्हणला आहे.

सुशांतच्या जाण्याने साऱ्यांचं खूप नुकसान झाले आहे. सुशांत तू खूप लवकर निघून गेलास, अशा शब्दांत शेन वॉटसनने त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 

महत्वाच्या बातम्या-

-ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांसाठी मंत्री हसन मुश्रीफांची खुशखबर

-भारतीय कंपनीला डावलून चीनला कॉन्ट्र‌ॅक्ट दिले अन्….- जितेंद्र आव्हाड

-“नेहरूंचं परराष्ट्र धोरण चुकलं म्हणून टाळ्या मिळतील पण सैनिकांचं बलिदान थांबवण्याची जबाबदारी मोदींचीच”

-शहि…तर मग संरक्षण उत्पादने, अणुबॉम्ब बनवायचे कशाला?- संजय राऊत

-चीनवर सर्जिकल स्ट्राईक करा; भाजपच्या ‘या’ माजी नेत्याची नरेंद्र मोदींकडे मागणी