Top news मनोरंजन

Sushant Singh Rajput: अभिनय सोडून सुशांत करणार होता हे काम, मोठी माहिती हाती

Sushant Singh Rajput 2

मुंबई | बाॅलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने 20 जून 2020 रोजी राहत्या घरी बांद्रा येथे आत्महत्या केली होती. सुशांतच्या निधनाने संंपुर्ण देशच हादरला होता. (Sushant Singh Rajput Birth Anniversary)

त्यानंतर अनेक महिने सीबीआय या प्रकरणाचा तपास करत होती. मात्र, अखेर सुशांतने आत्महत्या केल्याचं रिपोर्टमधून स्पष्ट झालं होतं.

अशातच आज सुशांतची बर्थ अॅनिव्हर्सरी म्हणजेच जयंती आहे. आज सुशांतचे अनेक चाहते सोशल मीडियावर त्यांची आठवण काढत असल्याचं दिसतंय.

सुशांत अनेक अडचणींचा सामना करत होता. सुशांतला काही दिवसांपासून चित्रपट मिळत नव्हते. मात्र, तो त्याच्या कामाबद्दल खूप पॅशिनेट होता.

अशातच सुशांतने स्वत: एका मुलाखतीत त्यांच्या प्लॅन बी बद्दल खुलासा केला होता. जर सिनेसृष्टीत यश आलं नाही तर काय करणार होता? असा सवाल सुशांतला विचारण्यात आला होता. त्यावर सुशांतने उत्तर दिलं.

मी स्वतःचे चित्रपट बनवणार असून मुंबईतील फिल्मसिटीमध्ये कॅन्टीन चालवणार आहे, असं सुशांतने या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. प्लॅन बी असं काही नाही. तो फक्त फिल्मसिटीमध्ये वेळ घालवण्याचा टाईमपास होता, असंही तो म्हणतो.

फिल्मसिटीमध्ये दररोज काही ना काही होतच असतं. त्यामुळे त्याठिकाणी मी कॅन्टिन टाकण्याचा विचार करत होतो, असं सुशांतने त्यावेळी मुलाखतीत सांगितलं होतं.

दरम्यान, सुशांत आज आपल्यात नाही. मात्र, त्याचं ते निखर हास्य अजूनही चाहत्यांच्या नरजेतून जात नाही.

महत्त्वाच्या बातम्या – 

“शरद पवारांचा हा ढोंगीपणा, ज्या छगन भुजबळांना राष्ट्रवादीत घेतलं त्यांनीच…”

“मी कशाला त्यांची भेट घेऊ? आतापर्यंत कधीच शरद पवारांच्या…”

 नरेंद्र मोदींची मोठी घोषणा! इंडिया गेटवर उभारणार सुभाष बाबूंचा भव्य पुतळा

 शरद पवार म्हणतात, “भाजपवाले कधीपासून गांधीवादी झाले…”

 …तर संपत्तीवर मुलींचा पहिला अधिकार, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय