सुशांत प्रकरणाचं गूढ उकलणार; मानसोपचार तज्ज्ञांनी केला सर्वात मोठा खुलासा!

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. सर्वोच्च न्यायालयानं सुशांत प्रकरण सीबीआयच्या हाती सोपविलं आहे. सुशांतप्रकरणी तब्बल 13 दिवस तपास केल्यानंतर सुशांतनं आत्मह.त्या केल्याचं सीबीआयनं स्पष्ट केलं आहे. सीबीआयनं आता सुशांत प्रकरणात त्याच्या आत्मह.त्येच्या बाजूनं तपास सुरु केला आहे.

सुशांतनं नक्की कोणत्या कारणामुळे एवढं टोकाचं पाऊल उचललं याचा सीबीआय सध्या शोध घेत आहे. तसेच सुशांतन स्वतः आत्मह.त्या केली की सुशांतच्या आत्मह.त्येमागे कोणता घा.तपात होता, याचाही शोध सीबीआय घेत आहे.  अशातच आता सुशांतवर उपचार करणाऱ्या मानसोपचार तज्ञांनी सीबीआयला महत्वाची माहिती दिली आहे.

सुशांतनं आत्मह.त्या करण्यामागे खूप काही गोष्टी असू शकतात. सुशांतला त्याच्या करिअरमध्ये मिळालेलं अपयश, नैराश्य, चिंता, नकारात्मकता तसेच सुशांतनं त्याच्या आयुष्यात गमावलेल्या माणसांची पोकळी अशा एक ना अनेक गोष्टी सुशांतच्या आत्मह.त्येला कारणीभूत असू शकतात, अशी माहिती मानसोपचार तज्ञांनी दिली आहे.

तसेच सुशांतमध्ये भूक न लागणे, निद्रानाश, चिंता अशी लक्षणं दिसत होती. सुशांतच्या आयुष्यात त्याच्या अपेक्षेप्रमाणे काहीच घडत नाही, असं सुशांतला सातत्यानं वाटत होतं. त्यामुळे सुशांतला सतत आपण असुरक्षित असल्याचा भास होत असायचा, असा खुलासा सुशांतवर उपचार करणाऱ्या मानसोपचार तज्ञांनी सीबीआयसमोर केला आहे.

आपल्या आजारामुळे आपल्या घरच्यांना त्रास होईल, अशी चिंता सुशांतला सतत लागून होती. तसेच सुशांतच्या उपचारादरम्यान रिया चक्रवर्ती सातत्यानं डॉक्टरांच्या संपर्कात होती. रिया सतत डॉक्टरांना कॉल करून सुशांतच्या प्रकृतीविषयी माहिती देत असल्याचंही मानसोपचार तज्ञांनी सांगितलं आहे.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यानं ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोसुद्धा याप्रकरणी तपास करत आहे. सुशांत प्रकरणात अं.मली पदार्थांचा व्यापार या गुन्ह्याखाली एनसीबीनं आत्तापर्यंत सहा जणांना ताब्यात घेतलं आहे. तसेच आज सकाळी सुशांतची कथित ए.क्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा या दोघांच्या घरी एनसीबीनं छापा टाकत मिरांडाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावामधील धक्कादायक चॅटिंग आलं समोर, पाहा काय आहे चॅट

सुशांतप्रकरणी मोठी बातमी! रियाच्या घरी छापा टाकत ‘या’ व्यक्तीला एनसीबीनं घेतलं ताब्यात

एकट्याने गाडी किंवा सायकल चालवताना मास्क घालणे बंधनकारक आहे का?

आधी बेड मिळाला नाही, नंतर पार्थिवाची हेळसांड; पुण्याच्या माजी महापौराचा दुर्दैवी शेवट!

“सुशांतप्रकरणी भाजपचं तोंड काळं होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे”