मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर त्याची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री अंकिता लोखंडे चांगलीच चर्चेत होती. सुशांतच्या मृत्युचे दुःख अंकितासाठी असहाय्य होतं. परंतु काही दिवसांनी स्वतःला सावरून अंकिता पुढे चालली.
अशातच आता अंकिता लवकरच लग्न करणार असल्याची बातमी समोर आली आहे. अभिनेता शाहीर शेखने एका मुलाखतीत याबद्दल खुलासा केला आहे. शाहीर शेख ‘पवित्र रिश्ता 2’ मध्ये मानवच्या भूमिकेत दिसणार आहे.
पवित्र रिश्ताच्या पहिल्या भागात अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मानवची भूमिका साकारली होती. शाहीर शेखने आणि अंकिता लोखंडेने नुकतीच एका वृत्त वहिनीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत दोघांनी पवित्र रिश्ता 2 मधील आपल्या भूमिकेविषयी काही गोष्टी शेअर केल्या आहेत.
मालिका संपल्यावर काय करणार आहेस? असा सवाल अंकिताला मुलाखती दरम्यान करण्यात आला होता. यावर उत्तर देताना अंकिता म्हणाली की, अजून तरी या गोष्टीचा काही विचार केला नाही. यानंतर शाहीर मिश्कीलपणे म्हणतो अग तू तर लग्न करणार आहेस ना? शाहिरच्या या वाक्यानंतर अंकिता त्याला चूप राहण्यास सांगते.
पुढे अंकिता म्हणते की, मी अद्याप असं काही ठरवलेलं नाही परंतु फेब्रुवारी महिन्यात नवीन काहीतरी सुरू करणार आहे. आता अंकिता नवीन काय करणार? असा सवाल सर्वांना पडला आहे.
दरम्यान, शाहिरने चेष्टेत बोललेल्या या गोष्टीनंतर अंकिताच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तिचे चाहते तिला लग्नाची तारीख काय असेल, असा सवाल करत आहेत. अंकिता लोखंडे गेल्या तीन वर्षांपासून अभिनेता विकी जैनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
अंकिता सतत आपल्या सोशल मीडिया आकाऊंटवरून दोघांचे फोटोज आणि व्हिडीओज शेअर करत असते. विकी जैनसोबत लग्न करण्याच्या विचारात असल्याचं देखील अंकिताने काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं.
महत्वाच्या बातम्या-
‘हेल्मेट घालूनच पहिला कंडोम विकत घेतला होता’; ‘या’ बड्या अभिनेत्याने शेअर केला मजेशीर किस्सा
अचानक अस्वल चढलं गाडीवर अन्…, पाहा व्हायरल व्हिडीओ
झोपलेल्या चिमुकल्या जवळ जाऊन कुत्र्यानं जे केलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हायरल व्हिडीओ
काय सांगता! माणसांप्रमाणे चक्क पक्षीही करतोय चोरी, पाहा व्हिडीओ
ओव्हरटेक करायला गेला अन्…, पाहा अंगाचा थरकाप करणारा व्हिडीओ