Top news मनोरंजन

त्यांनी मला सांगितलं, २००% ही ह त्या आहे… सुशांतच्या वकिलाचा धक्कादायक दावा

मुंबई | अभिनेता सुशांत सिंहने आ.त्मह.त्या केली की त्याची ह.त्या झाली, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. सुशांतसिंहचे कुटुंबीय आणि त्याच्या चाहत्यांना त्याच्यासोबत नेमकं काय घडलंय?, यासंबंधी अजूनही प्रश्न असून ते अजूनही उत्तराच्या प्रतीक्षेत आहेत.

सुशांतसिंहची केस सीबीआयकडे सुपूर्द केली आहे, पण सीबीआय अजूनही त्याचा तपास लावू शकलेली नाही. यातच आता सुशांतसिंगच्या वकिलांचेही धैर्य खचले आहे, याबाबतची माहिती त्यांनी सोशल मीडियाद्वारे दिली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनूसार, एम्सची टीम या प्रकरणात अद्याप कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचू शकलेली नाही. सुशांत सिंह राजपूतचे मृ.त शरीर १४ जूनला त्यांच्या राहत्या घरी मिळाले होते. त्यावेळी मुंबई पोलिसांनी प्राथमिक चौकशीत ही आ.त्मह.त्या आहे, असं म्हटले होते.

पण मुंबई पोलिसांना आ.त्मह.त्या केल्याची कोणतीही चिठ्ठी मिळाली नाही. त्यानंतर श.ववि.च्छेदनाच्या अहवालात मृ.त्युचे कारण श्वास घ्यायला त्रास झाला, असं सांगितले. पण सुशांतला ओळखणारे आणि त्यांचे चाहते ही गोष्ट मान्य करायला तयारच नाही की त्याने आ.त्मह.त्या केली आहे.

सुशांतच्या कुटुंबियांनी एफ.आय.आर दाखल केला आणि त्यानंतर ही केस सीबीआयकडे देण्यात आली आहे. पण तब्बल तीन महिने उलटले तरीही सुशांतच्या मृ.त्यूचे सत्य समोर आलेले नाही.

सुशांत सिंहचे वकील विकास सिंह यांनी माध्यमांना सांगितले, आज आम्हाला खूपच दुःख होत आहे. कारण ही केस कोणत्या दिशेला चालली आहे, हे आम्हाला कळत नाही. आजपर्यंत सीबीआयने एकदाही प्रेसला सांगितले नाही, की त्यांना या केसमध्ये काय मिळाले आहे. ज्या वेगाने केस पुढे सरकत आहे, त्याबाबत मी समाधानी नाही, असंही ते म्हणाले.

शुक्रवारी वकील विकास सिंह यांनी ट्विटरवर म्हटलंय, सुशांत सिंह मृ.त्यू प्रकरण शोधण्यात सीबीआयला खूपच वेळ लागत आहे. मी खूप दिवसांपूर्वी एम्सच्या एका डॉक्टर टीमला सुशांतचे काही फोटो पाठवले होते. ते पाहिल्यावर त्यांनी सांगितले की, २००% ही ह.त्या आहे, आ.त्मह.त्या नाही.”

या ट्विटला सुशांत सिंहची बहीण श्वेता सिंह कीर्ति यांनी रिट्विट करून लिहिले की, आम्ही एवढ्या दिवस धैर्य ठेवले आहे. अखेर सत्य समोर यायला आणखी किती कालावधी लागणार आहे? मीडिया रिपोर्टनूसार, सुशांतच्या ग.ळ्यावर असलेल्या निशाणाबाबत सीबीआय अजूनही कोणत्या निर्णयापर्यंत पोहोचलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

काही लोकांनी अलका कुबल यांना श्रद्धांजली वाहिली; त्यावर अलका कुबल म्हणतात…

सुशांत प्रकरणाला धक्कादायक वळण! चौकशी दरम्यान सारा अली खाननं केला मोठा खुलासा म्हणाली…

“शरद पवार पाठीमागच्या बाजूने भाजपला सपोर्ट करत आहेत”

करण जोहर पुन्हा पुन्हा तेच सांगतोय, “माझा त्या प्रकाराशी काहीही संबंध नाही”

दीपिका पदुकोणची 100 कोटी किंमतीची ‘ही’ गोष्ट सापडलीय संकटात?