सुशांत सिंह राजपूतची बहीण अर्णव गोस्वामींना समर्थन देत म्हणतेय…

मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अलिबाग पोलिसांनी अ.टक केलं आहे. इंटेरिअर डिझायनर अन्वय नायक यांना अर्णव गोस्वामींनी आ.त्मह.त्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप अन्वय नायक यांच्या किटुंबियांनी केला होता. यानुसार अलिबाग पोलिसांनी अर्णव यांच्यावर कारवाई करत त्यांना ग.जाआड केलं आहे.

अर्णव गोस्वामी यांच्या अ.टकेनंतर काही लोक अर्णव यांना पाठिंबा देत आहेत. तर काही लोक पोलिसांनी केलेल्या कारवाईला पाठिंबा देत आहेत. याप्रकरणी अनेक राजकीय नेत्यांसह दिग्गज लोक सुशांत प्रकरणावरून राज्य सरकारवर टीका करत आहेत. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपुतचे अनेक चाहते देखील अर्णव गोस्वामींना पाठिंबा देत आहेत. अशातच आता सुशांतची बहीण श्वेता कीर्ती सिंह देखील अर्णव गोस्वामींच्या समर्थनार्थ मैदानात उतरली आहे.

श्वेता कीर्ती सिंह सोशल मीडियावर पोस्ट करत गोस्वामींना पाठिंबा देत आहे. तसेच ती पोस्टमधून इतरांना देखील अर्णवच्या समर्थनार्थ पुढे येण्याचं आवाहन करत आहे. श्वेतानं नुकतंच अर्णव गोस्वामींच्या समर्थनार्थ एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये तिने श्री रविशंकर यांचे एक उदाहरण दिले आहे.

आपल्या सामर्थ्याला कमी लेखू नका. आपण कोणताही चमत्कार घडवून आणू शकतो. आपण गोष्टी 180 अंशसेल्सियस पर्यंत देखील फिरवू शकतो, असं ट्वीट श्वेता कीर्ती सिंहने केलं आहे. या ट्वीट सोबत तिने एक हॅशटॅग देखील वापरला आहे.

‘वी स्टँड विथ अर्णव’ असं हॅशटॅग श्वेतानं या पोस्टसोबत वापरलं आहे. तसेच श्वेताने यापूर्वी देखील अर्णवच्या समर्थनार्थ एक ट्वीट केलं होतं.यामध्ये तिने अर्णव नाही तर दिवाळी नाही, असं लिहिलं होतं. सुशांतचे चाहते श्वेताची हि पोस्ट चांगलीच व्हायरल करत आहेत.

दरम्यान, अर्णव गोस्वामी यांना अ.टक केल्यानंतर त्यांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयानं अर्णव गोस्वामी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

स्थानिक न्यायालयानं अर्णव गोस्वामी यांना 14 दिवसांची कोठडी सुनावल्यानंतर अर्णव गोस्वामी यांच्या वकिलांनी मुंबई हाय कोर्टात गोस्वामी यांच्या जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, मुंबई हायकोर्टाने अर्णव गोस्वामी यांचा जामिन अर्ज फेटाळून लावला आहे.

मुंबई हायकोर्टाने अर्णव गोस्वमिंचा जामीन अर्ज फेटाळताच अर्णव गोस्वामी यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात अर्णव गोस्वामी यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

धक्कादायक! अर्णव गोस्वामी का.रागृहात मोबाईल वापरत होते, पोलिसांनी केली कठोर कारवाई

अर्णव गोस्वामी यांच्या वकिलांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय! सर्वोच्च न्यायालय उद्या करणार सुनावणी

अमीर खान हात जोडून सर्वांची माफी मागतोय! जाणून घ्या नक्की यामागील कारण काय आहे?

डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी मोठा झटका! लवकरंच ट्रम्प यांना अ.टक होणार?

‘मोदींविरोधात उद्धटपणे बोलू नका’; तेजस्वी यादव यांचा RJD नेत्यांना इशारा, नक्की भानगड काय आहे?