दुःख विसरण्यासाठी सुशांतची बहीण करतेय ‘हे’ काम, वाचा सुशांतची बहीण का करतेय असं?

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकारणानं संपूर्ण देशात खळबळ घातली होती. बिहार आणि मुंबई पोलिसांनंतर सीबीआय आणि एनसीबी सारख्या उच्च दर्जाच्या एजन्सीजने याप्रकरणी शोध सुरू केला. सुशांतच्या मृ.त्यूला तब्बल पाच महिने उलटून गेले तरी देखील अद्याप याप्रकरणी सीबीआयचा तपास सुरूच आहे.

सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी सुशांतची बहीण श्वेता कीर्ती सिंह सुरुवातीपासूनच प्रयत्न करत आहे. यासाठी तिने सोशल मीडियावर जणू सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलनच सुरू केलं आहे. अशातच आता श्वेताने आपलं दुःख कमी करण्यासाठी एक नवीन मार्ग शोधला आहे.

या नवीन उपयाबद्दल श्वेताने स्वतः सोशल मीडियावर सांगितले आहे. सुशांतच्या मृ.त्यूपासून श्वेता सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह राहत आहे. श्वेताने शेअर केलेल्या प्रत्येकच पोस्टला सुशांतचे चाहते भरभरून प्रेम देत असतात. अशातच आता श्वेताने दुःख कमी करण्यासाठी जो उपाय सांगितला आहे त्यालाही लोक भरभरून प्रेम देत आहेत.

श्वेताने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत श्वेताची मुले फ्रेयजा आणि निर्वाण दिसत आहेत. श्वेता आपल्या मुलांना भगवद्गीता शिकवतानाचा हा फोटो आहे. या फोटोसोबत कॅप्शन लिहीत श्वेताने फोटोबद्दल माहिती दिली आहे.

फ्रेयजा आणि निर्वाणला भगवद्गीता शिकवत आहे. नित्यनियमाने याचे पठण करण्याची त्यांना सवय लावत आहे. आपल्याला आतून तोडून ठेवणारे दुःख आणि निराशा आध्यात्मिकतेच्या मार्गानेच दूर होऊ शकतं, असं कॅप्शन श्वेताने या फोटोला दिले आहेत.

तसेच जेव्हा तुम्ही देवाशी जोडले जाता तेव्हा तुमच्या जवळ बाहेरील संकटांशी लढण्यासाठी अतूट ऊर्जा आणि शक्ती येते. आपण सर्वजण देवावर खूप प्रेम करतो आणि देव नेहमीच आपल्याबर असतो. चांगले नेहमीच वाईटावर विजय मिळवते, असंही श्वेताने या पोस्टसोबत लिहिलं आहे.

दरम्यान, सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीनं सुशांतच्या बहिणींविरोधात तक्रार दाखल केली होती. सुशांतच्या बहिणी प्रियंका आणि मितू सिंह सुशांतला कोणत्याही डॉक्टरी सल्ल्याशिवाय औषध देत असल्याचा आ.रोप रिया चक्रवर्तीनं केला होता.

8 जूनला सुशांतने बहिणीसोबत केलेलं चॅटिंग मला दाखवली होती. सुशांतच्या बहिणीने त्याला काही औषधे घ्यायला सांगितली. सुशांतची बहिण दिल्लीतील डॉक्टरांच्या मदतीने सुशांतला प्रतिबंधक औषधे देत होती, असं रियानं दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं होतं.

सुशांतच्या मानसिक आरोग्यावर यामुळे परिणाम होत होता, असा आरोप रियाने एफआयआरमध्ये केला होता. तसेच डॉक्टरांनी सांगितलेलीच औषधं तू घ्यायला हवी. बहिणीने सल्ला दिलाय म्हणून औषधे घेऊ नकोस कारण तिच्याकडे मेडिकल डिग्री नाही, असंही रियानं यावेळी सुशांतला बजावलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

…म्हणून छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना ‘या’ व्यक्तीने चाबकाचे फ.टके दिले

चित्रपट सृष्टीला आणखी मोठा धक्का! पद्मविभूषण पुरस्कारप्राप्त ‘हा’ दिग्गज अभिनेता काळाच्या पडद्याआड

धक्कादायक! घटस्फो.ट घेण्याआधी भर कोर्टात पत्नी म्हणाली मला पतीपासून गरोदर…

दिवाळीत सुशांतच्या चाहतीने केलेल्या ‘या’ गोष्टीमुळे सोशल मीडियावर झालं भरघोस कौतुक

कतरिनाचे ‘हे’ फोटो तुम्हाला करतील घायाळ! वाचा कतरिना कुठे करतेय हे फोटोशूट?