Top news मनोरंजन

सुशांतची ह.त्या की आ.त्मह.त्या; आता सीबीआयनंही केला सर्वात मोठा खुलासा!

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्यू प्रकरणानं संपूर्ण देश हादरून गेला होता. मुंबई आणि बिहार पोलिसांनंतर सीबीआय, ईडी आणि एनसीबी सारख्या तीन उच्च दर्जाच्या एजन्सी  याप्रकरणी शोध घेत आहेत.

सुशांत प्रकरणानं संपूर्ण देशातील राजकारण देखील तापलं होतं. सुशांत प्रकरणावरून राजकारणात एकमेकांवर अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले. मात्र, आता अखेर सुशांत प्रकरणातील गुंता सुटताना दिसत आहे. सुशांतच्या मृ.त्युसंबंधित शोध घेण्यासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयाची मेडिकल टीमसुद्धा सीबीआयला मदत करत होती. एम्स रुग्णालयाच्या मेडिकल टीमनं अखेर सुशांत प्रकरणाचे मेडिकल अहवाल सीबीआयकडे सोपविले आहेत.

सुशांतच्या सर्व फोरेन्सिक रिपोर्टची फेरतपासणी करत सुशांत सिंह राजपुतची ह.त्या झाली नाही तर सुशांतनं आ.त्मह.त्या केली आहे, असा अहवाल एम्सच्या टीमनं सीबीआयला दिला आहे. सुशांत सिंह राजपूतची ह.त्या झाली असावी, या शक्यतेला एम्सच्या टीमनं नकार दिला आहे.

एम्सच्या मेडिकल टीमनं दिलेला रिपोर्ट, क्राईम सीन रिक्रीएशन, सुशांत प्रकरणी हाती लागलेले पुरावे, कित्येक लोकांची केलेली चौकशी या सर्व गोष्टी लक्षात घेत अखेर सीबीआयनं सुशांत प्रकरणी मोठा खुलासा केला आहे. सुशांत सिंह राजपूतची ह.त्या झाली नसून सुशांतनं आ.त्मह.त्याच केली होती, असा खुलासा सीबीआयनं केला आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्युपूर्वी त्याला वि.ष दिलं गेलं होता, असा दावा केला जात होता. मात्र, मुंबई बरोबरच दिल्लीच्या फॉरेन्सिक लॅबनं सुशांतला वि.ष दिलं गेल्याच्या गोष्टीला नकार दिला आहे. सुशांतला मृ.त्युपूर्वी कोणत्याही प्रकारचं वि.ष दिलं गेलं नव्हतं, असं या दोन्ही लॅब्जनं स्पष्ट केलं आहे.

तसेच सुशांतच्या घरातून सुशांतचा मोबाईल फोन लॅपटॉप, कॅमेरा, हार्ड डिस्क, इत्यादी गोष्टीही सीबीआयनं ता.ब्यात घेतल्या होत्या. मात्र, या सर्व गोष्टींची तपासणी करता सुशांतची ह.त्या केली गेली असावी, असा कोणताही पुरावा मिळाला नसल्याचं सीबीआयनं सांगितलं आहे.

दरम्यान, सीबीआयनं आता सुशांत प्रकरणाचा तपास सुशांतच्या आ.त्मह.त्येच्या बाजूने चालू केला आहे. सुशांतनं आ.त्मह.त्या का केली याचा शोध लावण्याचा प्रयत्न सीबीआय करणार आहे.

सुशांतच्या कुटुंबाने या अगोदरच सुशांतची कथित एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाने सुशांतला आ.त्मह.त्या करण्यास भाग पाडलं, असा आरोप केला होता. आता सीबीआय रिया चक्रवर्तीचे कुटुंब सुशांतच्या मृ.त्युला कारणीभूत होतं का?, याचाही शोध घेणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांत प्रकरणाला धक्कादायक वळण; आ.त्मह.त्या केली, असा अहवाल देणारा डाॅक्टर आला अडचणीत!

Bigg Boss 14 | लग्न केल्यानंतरही पारस छाबडासोबत रिलेशनमध्ये होती पवित्रा पुनिया?

सर रविंद्र जडेजाचा भीमपराक्रम; अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू!

#BigBoss14 | वाचा सुखविंदर कौर कशी बनली राधे माँ; फारच रंजक आहे कहानी

सलमान खूप गोड आहे म्हणत दिशा पटानीचा सलमानला ‘या’ गोष्टीसाठी होकार