Top news देश मनोरंजन

सुशांतसिंग राजपूत प्रकरणात न्यायालयाचा मोठा आदेश; सलमान खान, करण जोहरसह 8 बड्या सेलिब्रेटींना…

पाटणा | बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणी न्यायालयाने आता एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. ८ बड्या सेलिब्रेटींना कोर्टात हजर व्हावं लागणार आहे. न्यायालयाने यासंदर्भात निर्णय दिल्यानं ही महत्त्वाची घडामोड मानली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे या सेलिब्रेटींमध्ये अनेक बड्या कलाकारांचा समावेश आहे.

सलमान खान, करण जोहरसह ८ मोठ्या सेलेब्रिटींची यामध्ये नावं आहेत. ७ ऑक्टोबरला कोर्टात हजर व्हा, असा आदेश मुझफ्फरपूर जिल्हा न्यायालयानं दिला आहे. सलमान, करणसह मोठे अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि इतर बड्या असामींचा यामध्ये समावेश आहे.

सुशांतसिंग प्रकरणात अनेक खुलासे समोर येत आहेत. सत्य समोर येण्याची सर्वसामान्यांची अपेक्षा आहे, त्यामुळे यासंदर्भात अनेकांना अनेक प्रश्न आहेत. यासंदर्भात आता एका वकिलानं पुढाकार घेतला आहे. या वकिलानं मुझफ्फपूर न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणीवेळी न्यायालयाने सेलिब्रेटींना नोटीसा बजावल्या आहेत.

न्यायालयानं नोटीस कोणकोणत्या सेलिब्रेटींना बजावल्या?-

बिहारमधल्या मुझफ्फरपूर न्यायालयातील वकील सुधीर ओझा यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यांनी या प्रसिद्ध सेलिब्रेटींविरोधात खटला दाखल केला आहे. ही सर्व माणसं सुशांतच्या मृ.त्यूला जबाबदार असल्याचा धक्कादायक आरोप या वकिलानं केला आहे.

मुझफ्फरपूर न्यायालयानं या याचिकेवर सुनावणी घेतली आणि आठही जणांना न्यायालयात सादर व्हायचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशामध्ये सलमान खान, करण जोहर, आदित्य चोप्रा, साजिद नाडियादवाला, एकता कपूर, संजय लीला भन्साळी, भूषण कुमार आणि दिनेश विजयन या ८ जणांची नावं आहेत.

7 ऑक्टोबरला सर्व ८ सेलिब्रेटींनी स्वतःची बाजू मांडण्यासाठी न्यायालयात हजर रहावे, असा आदेश दिला आहे. या ८ जणांना एक सूटही असणार आहे, त्यांच्या वतीने त्यांचे वकील त्यांची बाजू मांडू शकतात.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतप्रकरणी CBI तपास करत आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना यामध्ये ड्र.ग्ज रॅकेट असल्याचंही उघड झालं आहे, त्यामुळे ना.र्कोटिक्स विभागानंही या प्रकरणात स्वतंत्र चौकशी सुरु केलेली आहे.

NCBने शुक्रवारी या प्रकरणात एक मोठी कारवाई केली, या प्रकरणी एक मोठा ड्र.ग्ज पेडलर ताब्यात घेतला आहे. राहिल विश्राम असं त्याचं नाव आहे, त्याच्या चौकशीत 1 किलो ड्र.ग्जच्या साठ्याचा तपास लागला आहे. याची किंमत 3 ते 4 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचं समजतं. राहिलच्या घरातून साडेचार लाखाची रोख रक्कमसुद्धा सापडली आहे.

NCB ने आतापर्यंत या प्रकरणात मोठी कारवाई करुन सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती, सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि इतर काही ड्र.ग्ज माफियांना देखील अटक केलेली आहे.

सॅम्युअल मिरांडा सुशांतचा हा सुशांतच्या घरचा मॅनेजर आहे. चौकशी केली तेव्हा रिया आणि शोविकचे मोबाईल चॅट्स समोर आले. त्यांच्या बोलण्यातून सॅम्युअल मिरांडा हा ड्र.ग्जचा सप्लाय करत होता, अशी माहिती समोर आली आहे.

अब्दुल बासित परिहार हा ड्र.ग्ज पेडलर आहे. इतकंच नाही तर बासित फक्त रिया आणि शोविकच्या सांगण्यावरून ड्र.ग्जचा जुगाड करायचा. दिपेश सावंत देखील सुशांतसिंग राजपूतचा नोकर आहे. ड्र.ग्ज प्रकरणात त्याचाही हात असल्याचं NCBच्या चौकशीत समोर आलं आहे.

दुसरीकडे सुशांतच्या फार्म हाऊसवर काम करणारा त्याचा मॅनेजर पवनने देखील मोठे खुलासे केले आहेत. सुशांत आपल्या लोणावळ्यातील फार्म हाऊसवर पार्ट्या करायचा. अनेकदा या ड्र.ग्ज पार्ट्या असायचा असा धक्कादायक खुलासा त्याने केलाय. या पार्ट्यांमध्ये सुशांतचे अनेक मित्र सहभागी व्हायचे. यातले अनेकजण सेलिब्रेटी असल्याचं त्यानं म्हटलंय.

सुमहत्त्वाच्या बातम्या-

मृ.त्यूआधी दिशानं 100 नंबरवर फोन केला होता का?; पोलीस तपासात झाला धक्कादायक खुलासा

उदयनराजे की संभाजीराजे?, मराठा आरक्षणाचं नेतृत्त्व कुणी करावं?; देवेंद्र फडणवीस म्हणतात…

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुंबईत उचललं ‘हे’ मोठं पाऊल!

रिया चक्रवर्ती ‘या’ देशांतून सुशांतसाठी ड्र.ग्ज मागवत होती

रियानं मला ‘या’ कारणामुळं जबरदस्ती सुशांतची मॅनेजर बनवलं होतं; श्रुती मोदीचा धक्कादायक खुलासा