सोलापूर | सोलापूर महापालिकेवर वर्षानुवर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीच सत्ता होती. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे कायम वर्चस्व राहिलं आहे. मात्र, मोदी लाटेत भाजपनं वर्षानुवर्ष असणाऱ्या काँग्रेसच्या सत्तेला खिंडार पाडलं. (Sushilkumar Shinde Will far from politics)
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरात मागील अनेक काळापासून आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे.
अशातच मागील काही वर्षांपासून सुशीलकुमार शिंदे राजकारणापासून लांंब आहेत. त्यामुळे आता आमदार प्रणिती शिंदे सुशीलकुमार शिंदे यांचा वारसा चावलताना दिसत आहे.
आगामी सोलापूर महापालिकेत सुशीलकुमार शिंदे यांचा वारसा कोण चालवणार असा सवाल आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. त्यावर आता खुद्द सुशीलकुमार शिंदे यांनी उत्तर दिलं आहे.
मी आता निवडणूक लढवणार नाही. मी आता रिटायरमेंट घेत असल्याचं देखील सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितलं आहे. सोलापूरात झालेल्या काँग्रेस भवनातील बैठकीनंतर त्यांनी यावर वक्तव्य केलं आहे.
इथून पुढे आमदार प्रणिती शिंदे या नेता असतील. मी रिटायर झालेला माणूस, आता मला कोण विचारतंय?, अशी मिश्किळ टिप्पणी सुशीलकुमार शिंदे यांनी केली आहे.
दरम्यान, आगामी सोलापूर महापालिकेत आता प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जातील, हे आता स्पष्ट झालं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
काल रात्री नेमकं काय घडलं?, रोहिणी खडसेंनी सांगितला थरारक अनुभव
नितेश राणे यांच्यासमोर बोलण्याची कुणाची ताकद नाही – नारायण राणे
“म्याव म्याव करणारे लपून बसलेत, गुन्हेगार लोक नेहमीच…”
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण
“पुढची 25 वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत”