सुषमा स्वराज यांची ‘ती’ इच्छा त्यांच्या मुलीने केली पूर्ण

नवी दिल्ली : माजी परराष्ट्रमंत्री आणि भाजपच्या दिग्गज नेत्या सुषमा स्वराज यांची अंतिम इच्छा त्यांची मुलगी बांसुरी स्वराज यांनी पूर्ण केली आहे. सुषमा स्वराज यांनी निधनापूर्वी जेष्ठ वकील हरीश साळवे यांना कुलभूषण जाधव खटल्याची फी देण्यासाठी बोलविले होतं.

आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव खटल्याच्या सुनावणीदरम्यान हरीश साळवे यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. यासाठी त्यांनी फक्त एक रुपयाचे मानधन घेण्याचे ठरविले होते. कुलभूषण जाधव खटल्याची सुनावणी झाल्यानंतर हरीश साळवे यांना त्यांची फी घेऊन जाण्यासाठी बोलवलं होतं. मात्र यानंतर सुषमा स्वराज यांचे निधन झाले. सुषमा स्वराज यांनी ही अंतिम इच्छा त्यांची मुलगी बांसुरी स्वराज यांनी पूर्ण केली आहे.

बांसुरी स्वराज यांनी शुक्रवारी हरीश साळवे यांची भेट घेऊन त्यांची फी दिली आहे. सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांनी एक ट्विट केले आहे.

बांसुरीने आज तुझी अंतिम इच्छा पूर्ण केली आहे. कुलभूषण जाधव खटल्याची एक रुपया फी, जी तू सोडून गेली होती, ती तिने हरीश साळवे यांची भेट घेऊन दिली आहे.

माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे 6 ऑगस्टला निधन झाले. निधनाच्या आधी हरीश साळवे यांना त्यांची फी देण्याची इच्छा व्यक्त केली होती.


 महत्वाच्या बातम्या-