12 आमदारांचं निलंबन रद्द! देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई | राज्यातील भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन केल्याप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आज (Supreme Court) महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 12 आमदारांचं निलंबन अखेर रद्द केलं आहे.

सर्वोच्च न्यायालयचा हा निर्णय महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. तर या निर्णयामुळे आता भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे.

अशातच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

हा केवळ 12 आमदारांचा नाही तर या 12 मतदारसंघातील 50 लाखांहून अधिक नागरिकांचा प्रश्न होता, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

सुरुवातीपासूनच, आम्ही म्हणत होतो की कृत्रिम बहुमत निर्माण करण्यासाठी आमच्या आमदारांना एवढ्या मोठ्या कालावधीसाठी निलंबित केलं गेलं, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

मोठ्या कालावधीसाठी निलंबित करणं हा पूर्णपणे असंवैधानिक आणि सत्तेचा घोर दुरुपयोग आहे असंही फडणवीस म्हणाले आहेत.

कोणतंही वैध कारण नसताना आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने आमची भूमिका कायम ठेवली असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

आमच्या 12 जणांचे निलंबन रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयासाठी आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाचे स्वागत करतो, असं म्हणत फडणवीसांनी आभार मानले आहेत.

दरम्यान, पावसाळी अधिवेशनात विधानसभेत ओबीसींच्या प्रश्नासाठी लढणाऱ्या आमदारांचं अभिनंदन देखील त्यांनी यावेळी केलं.

महत्त्वाच्या बातम्या – 

BREAKING: ठाकरे सरकारला मोठा धक्का, 12 आमदारांचं निलंबन अखेर रद्द

आदित्य ठाकरे म्हणतात, “नितेश राणेंवर काय बोलायचं? आमची पातळी…”

“ब्रा आणि भगवान”, वादग्रस्त वक्तव्यावरून श्वेता तिवारीच्या अडचणी वाढल्या

पुरुषांच्या ‘या’ सवयीमुळे होतोय स्पर्मवर परिणाम, लगेचच सवय सोडून द्या

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता