स्वाभिमानी संपावी म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातलेत पण…- राजू शेट्टी

मुंबई | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचं नाव विधानपरिषदेसाठी निश्चित झाल्यावर पक्षातील काही नेते नाराज आहेत. यावर राजू शेट्टींनी प्रतिक्रिया दिली आहे.

स्वाभिमानी संपावी म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातलेत पण आम्ही रक्त सांडून ही चळवळ उभी केली आहे. कोणाच्या मायावी प्रयत्नाने ती संपणार नाही. कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, जे सच्चे स्वाभिमानी असतील त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त होऊन एकमेकांना जखमी करु नये, असं राजू शेट्टी म्हणाले आहेत.

‘स्वाभिमानी’ हा एक परिवार आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा इथलं नातं घट्ट आहे. एका विधानपरिषदेच्या जागेमुळे जर नात्यात अंतर पडत असेल तर ही ब्याद आम्हाला नकोच, असं राजू शेट्टी म्हणाले.

शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचं सभागृह हे एक साधन आहे, अंतिम साध्य नव्हे. तेव्हा विधानपरिषदेच्या जागेवरुन कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज पसरवणं, मन दुरावणं योग्य नाही, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-सुशांतचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्या टीमनं घेतला मोठा निर्णय

-भारत कोरोनाचं संकट संधीमध्ये बदलेल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

-…तर ही विधानपरिषदेची ब्याद मला नकोच- राजू शेट्टी

-सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीची चौकशी; रिया वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये दाखल

-सुशांतबाबत ती पोस्ट करणं करण जोहरला पडलं भारी; इतके लाख फॉलोअर्स झाले कमी