Top news देश

‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’ आईने पोटच्या मुलाला मरणाच्या दारातून वाचवलं, पाहा काळजाचं पाणी करणारा व्हिडीओ

Photo Credit- Twitter/@susantananda3

नवी दिल्ली | या जगामध्ये सर्व गोष्टी या फक्त काही काळापूर्त्याच असतात. म्हणजेच कोणतीच गोष्ट ही परमन्टं नसते. परंतू या भौतिक जगामध्ये एक गोष्ट अशी आहे की, खरी आणि आपण या जगामध्ये असे पर्यंत ती आपल्या सोबत असते.

ती म्हणजे दुसरी-तिसरी कोणती नसून ते आपल्या आईच प्रेम असतं. आई ही आपल्या मुलावर जिवापाड प्रेम करत असते. आईच मुल कसंही असलं तरी त्याला ती तितकाच जीव लावत असते. शिवाय त्या बदल्यात ती त्याच्याकडून कोणत्याच गोष्टीची अपेक्षाही करत नाही.

अशातच याच संदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर नुकताच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका आईने आपल्या लहान लेकराला कसं मरणाच्या दारातून वाचलं ते असल्याचं दिसून येते आहे.

एका भिंतीच्या कडेला एक एक-दिड वर्षांचा मुलगा आणि त्याची आई विश्रांती करण्यासाठी बसले असल्याचं पाहायला मिळतं आहे. मुलगा आपल्या हातात असलेल्या खेळण्याबरोबर खेळत आहे. तर त्याची आई त्यांच्याकडे लक्ष देत आहे.

परंतू काही वेळानंतर अचानकच ते दोघं ज्या ठिकाणी बसलेले असतात. त्या ठिकाणीची भिंत कोसळते. भिंत कोसळायला लागली असल्याचं त्या मुलाच्या आईच्या लक्षात येतं आणि ती तातडीने उभी राहते आणि आपल्या मुलाला झाकून टाकते.

जेणेकरून भिंतीच्या पडणाऱ्या विटा तिच्या मुलाला लागू नयेत. त्यानंतर लगेचंच त्या महिला पती म्हणजेच त्या मुलाचे वडिल त्या ठिकाणी येतात आणि घाई-घाईने त्या मुलाला उचलून घेतात.

मात्र सुदैवाने त्या मुलाला कोणत्याही प्रकारची जखम किंवा मार त्याच्या शिरिराला लागला नसल्याचं समजतं आहे. तसेच हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक लोकांनी त्या महिलेचं कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे तिच्या जागृकपणाचं.

महत्वाच्या बातम्या-

चालाकी करत भर लग्नात मेहुणीनेच मारला चान्स, पाहा व्हिडीओ

बड्डेची कॅन्डल विझवताना ‘या’ अभिनेत्रीच्या केसांना लागली आग अन्…, पाहा व्हायरल व्हिडीओ

ऐकावं ते नवलंच! आता म्हैशीही करू लागल्यात स्टंट, पाहा व्हायरल व्हिडीओ

काय सांगता! चक्क 95 वर्षांची आजी चालवतीय चारचाकी गाडी, पाहा व्हिडीओ

ऐकावं ते नवलंच! चक्क लस घेताना 20 वर्षाचा तरूण लहान मुलांसारखा रडतोय, पाहा मजेशीर व्हिडीओ