मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी ‘या’ अभिनेत्रीने दुसऱ्या पतीविरोधात घेतली पोलिसात धाव

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीने आपला पती अभिनव कोहलीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केला आहे. अभिनव कोहली आपल्या मुलीला अश्लील फोटो दाखवून विनयभंग करतो, असा आरोप श्वेताने केला आहे. अभिनव आपल्या मुलीला मॉडेलचे अश्लील फोटो दाखवतो. त्याचप्रमाणे तिला अर्वाच्च भाषेत शिवीगाळही करतो, असा दावा श्वेताने केला आहे. या प्रकरणी श्वेताच्या तक्रारीनंतर अभिनव कोहलीला पोलिसांनी अटक केली आहे.

अभिनव नेहमीच माझ्या आणि माझी मुलगी पलक हिच्यासोबत गैरवर्तुणक करायचा. मात्र पलकवर हात उचलल्याने पाणी डोक्यावरून गेलं. त्यामुळे हे प्रकरण पोलिसांपर्यंत नेण्याशिवाय माझ्याकडे आणखी कोणताही पर्याय नव्हता, असं श्वेता तिवारीने म्हटलं आहे. म्हणून याप्रकरणी कांदिवलीतील समतानगर पोलीस स्टेशनमध्ये तिने पतीविरोधात तक्रार दाखल केली.

पलक ही श्वेता आणि तिचा पहिला पती राजा चौधरीची मुलगी आहे. अभिनव हा श्वेताचा दुसरा पती आहे. अभिनवने अनेकदा दारुच्या नशेत श्वेताची मारहाण केली, असंही श्वेताने सांगितलं आहे.

श्वेता आणि अभिनव यांची भेट ‘जाने क्या बात हुई ‘ या मालिकेच्या सेटवर झाली. तिथे त्यांची मैत्री झाली आणि हळूहळू त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्यांनी 2013 साली लग्न केलं. त्या दोघांना रेयांश नावाचा दोन वर्षाचा मुलगा आहे. लग्नानंतर ही श्वेताची पहिली मुलगी पलक श्वेता सोबतच राहते.

दरम्यान, श्वेताने कौटुंबिक हिंसाचारामुळे पहिल्या पतिला घटस्फोट दिला होता आणि अभिनवसोबत लग्न केलं. मात्र अभिनव श्वेताच्या आपल्या आणि मुलीसोबतच्या वागणुकीमुळे पुन्हा एकदा कौटुंबिक हिंसाचाराची बळी ठरल्याचं दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-भारताचा वेस्ट इंडीजवर 59 धावांनी विजय

-पूरात विखुरलेली घरं सावरण्यासाठी संभाजीराजे सरसावले; जाहीर केली 5 कोटींची मदत

-भाजपला जम्मू-काश्मीरमध्ये कोणी आणलं???; मुफ्ती-ओमर अब्दुल्ला यांच्यात शाब्दिक चकमक

-पवार-महाजन वाद भडकला; आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पोस्टरवर लघुशंका

-रोहित शर्माकडून रिषभ पंतचं नामकरण; ठेवलं हे विनोदी नाव…