दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींनाही दिसतात Omicronची ही 5 लक्षणं; वेळीच व्हा सावध

नवी दिल्ली | जगभरात सध्या कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. ओमिक्रॉन या अत्यंत वेगानं संसर्ग पसरवणाऱ्या नव्या प्रकारामुळे ही साथ आली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या एका दिवसात हजारोंच्या संख्येनं वाढत असून सर्वत्र चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय असल्याचं आरोग्य विभागामार्फत वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र तरीही अनेक लोकांनी लस घेतली नाही. अशातच धक्कादायक माहिती समोर आली आहे.

लसीकरणाबाबत अनेकजण गंभीर नसल्याचं स्पष्ट होत आहे. अशातच आता दोन डोस घेतलेल्यांमध्ये देखील काही लक्षणं दिसत असल्याचं समोर आलं आहे.

वेळोवेळी कोरोनाच्या लक्षणामध्ये बदल होत आला आहे. कोरोनाचा ओमिक्राॅन हा सर्वात धोकादायक व्हेरियंट आहे, असं युरोपियन राष्ट्रांचं म्हणणं आहे. पण लसीकरणाचा वेग वाढवणं गरजेचं आहे.

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण होण्याचा धोका तुलनेत कमी होता. लस घेतलेल्या लोकांमध्ये कोरोनाची लागण झाली तरी त्यांच्यात फार तीव्र लक्षणं जाणवत नसल्याचंही दिसत आहे.

लस घेतलेल्या नागरिकांमध्ये सर्दी म्हणजे सतत नाक गळणं, खोकला, ताप येणं, सतत घसा खवखवणं, अंग दुखणं ही साधारण लक्षणं दिसत असल्याचं आता स्पष्ट होत आहे. पण ही लक्षणं दिसली तरी नागरिकांना घाबरण्याचं कारण नाही.

दरम्यान, सध्या जागतिक आरोग्य संघटनेकडून लसीकरण वाढवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. लसींच्या दोन्ही डोससह बूस्टर डोस घेण्याची घोषणा सर्वत्र करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 एका आयटम साॅंगसाठी नोरा घेते तब्बल ‘इतकं’ मानधन; आकडा ऐकून व्हाल थक्क

सानिया मिर्झाची निवृत्तीची घोषणा; ‘या’ कारणामुळे सोडणार टेनिसचं कोर्ट

अखेर डुग्गू सापडला! बेपत्ता स्वर्णव सापडल्यानं आई-वडिल भावूक

रावसाहेब दानवेंना जोर का झटका; सोयगाव नगरपंचायतीत शिवसेनेनं मारली बाजी 

नारायण राणेंना शिवसेनेचा ‘दे धक्का’, शेवटच्या क्षणी एका आकड्याने…