Stealth Omicron रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ, समोर आली ‘ही’ लक्षणं

मुंबई | कोरोना महामारीनं सर्वांना काळजीत टाकलं आहे. गेल्या दीड वर्षांपासून कोरोनानं विविध स्वरूपात आणि नवीन व्हेरियंटच्या माध्यमातून थैमान घातल्याचं पहायला मिळालं.

कोरोनाच्या रूग्णसंख्येत नवीन वर्षाच्या सुरूवातीपासून झपाट्यानं वाढ झाली. दक्षिण आफ्रिकेतून कोरोनाचा नवा प्रकार ओमिक्राॅन समोर आला आणि जगाची झोप उडवली आहे.

जगभर कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटनं जगभरात अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांना आपल्या कार्यक्षेत्रात ओढले आहे. परिणामी संशोधक आणि अभ्यासक देखील चिंतेत आहेत.

ओमिक्राॅन असो किंवा कोरोना या रोगावर सध्यातरी लसीकरण हा एकमेव उपचार उपल्बध आहे. परिणामी जागतिक आरोग्य संघटनेनं लसीकरण वाढवण्याच्या सुचना दिल्या आहेत.

ओमिक्राॅन व्हेरियंटनं नागरिकांना चिंतेत टाकलं असताना आता ओमिक्राॅनचा नवा उपप्रकार समोर आला आहे. बीए.2 म्हणजेच Stealth Omicron या नव्या स्ट्रेननं अधिक प्रमाणात चिंता वाढवली आहे.

हा स्ट्रेन सध्या मोठ्या गतीनं रूग्णंसख्या वाढवण्यास कारणीभूत ठरत आहे. हा स्ट्रेन सध्या आरटीपीसीआर चाचणीत देखील दिसत नसल्यानं डाॅक्टरांना देखील चिंता लागली आहे.

कोरोनाच्या इतर व्हेरियंटच्या तुलनेत ओमिक्राॅन कमी धोकादायक असल्याचं स्पष्ट होतं पण ओमिक्राॅनचा हा स्टिल्थ प्रकार मात्र इतर व्हेरियंटच्या तुलनेत अधिक धोकादायक आहे.

वास घेण्याची क्षमाता कमी होणं, सतत डोकं दुखणं, सतत सर्दीमुळं नाक वाहणं, जिभेला चव नसणं, घसा खवखवणे ही या स्टिल्थ व्हेरियंटची लक्षणं आहेत. परिणामी नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटना सध्या ओमिक्राॅनच्या या प्रकाराच्या कार्यक्षमतेवर संशोधन करत आहे. परिणामी सध्या लसीकरण हा एकमेव पर्याय असल्याचं आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

 “किंग कोहलीचं युग संपलंय, आता नव्या कॅप्टनला…”, विराटच्या कोचचं मोठं वक्तव्य

“पूनम महाजन सध्या कुठं आहेत? त्यांचं भाजपशी नातं काय?”

“… कबूलीनामा संजय राऊतांनीच दिलाय, पुरोगामी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ऐकताय ना?”

 महिंद्रांनी पाळला शब्द, जिप्सी बनवणाऱ्या दत्तात्रय लोहारांच्या दारात उभी केली नवी कोरी बोलेरो

पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी; Google ने घेतला हा मोठा निर्णय