Taapsee Pannu Wedding l सध्या बॉलीवूडमध्ये लगीनसरे सुरु आहे. अगदी काही दिवसांपूर्वी म्हणजेच वर्षाच्या सुरवातीलाच आमिर खानची लाडकी लेक आयरा खानने तिच्या बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत अगदी लग्न केले. यानंतर नुकतेच रकुलप्रीत सिंग आणि जॅकी भगनानी हे जोडपं गोव्यामध्ये लग्नबंधनात अडकले आहेत. या जोडप्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले आहेत. आता बी टाऊनमधील आणखी एक अभिनेत्री नवरी बनण्याच्या तयारीत आहे. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून शाहरुख खान स्टारर डंकीची अभिनेत्री तापसी पन्नू आहे. तापसी तिच्या प्रियकराशी लग्न करणार आहे.
Taapsee Pannu Wedding l तापसी पन्नू अडकणार लग्नबंधनात :
तापसी पन्नू गेल्या 10 वर्षांपासून भारतीय बॅडमिंटन संघाचे प्रशिक्षक मॅथियास बो यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. आता अभिनेत्री तिच्या दीर्घकाळाच्या बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधणार आहे. तापसी आणि मथियास मार्चच्या अखेरीस उदयपूरमध्ये शीख-ख्रिश्चन समारंभात लग्न करू शकतात. रिपोर्टनुसार, हे लग्न कोणत्याही बॉलिवूड ए-लिस्टर्सशिवाय अतिशय इंटिमेट लग्न असेल. मात्र या कपलने अद्याप त्यांच्या लग्नाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
Taapsee Pannu Wedding l तापसी पन्नू मॅथियाससोबत खूश :
तापसीने नुकताच तिचा आनंद व्यक्त केला होता आणि तिच्या नात्याबद्दल माहिती देखील शेअर केली होती. राज शामानी यांच्याशी झालेल्या संभाषणात तापसीने खुलासा केला होता की, 2013 मध्ये जेव्हा तिने “चश्मे बद्दूर” चित्रपटातून पदार्पण केले होते तेव्हा तिची मॅथियासशी भेट झाली होती. तिच्या वचनबद्धतेची पुष्टी करताना तापसी म्हणाली, “मी तेव्हापासून एकाच व्यक्तीसोबत आहे आणि मला त्याला सोडण्याचा किंवा दुसऱ्यासोबत राहण्याचा कोणताही विचार नाही कारण मी या नात्यात खूप आनंदी आहे.
या आगामी चित्रपटात तापसी पन्नू पुन्हा झळकणार! :
तापसी पन्नूचा शेवटचा रिलीज झालेला चित्रपट शाहरुख खान स्टारर डंकी हा होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली आहे. आता तापसी अर्शद सय्यद लिखित आणि दिग्दर्शित ‘वो लड़की है कहाँ’ या कॉमेडी-ड्रामा चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती प्रतीक बब्बर आणि प्रतीक गांधी यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
News Title : Taapsee Pannu And Mathias Boe Wedding
महत्त्वाच्या बातम्या-
आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींनी मोहाला बळी पडू नये
जरांगेंच्या आंदोलनाला शरद पवारांचा पाठिंबा?; राजेश टोपेंच्या ‘त्या’ वक्तव्याने एकच खळबळ
‘फेस काॅलवर काय काय बोलले…’; जरांगेंनी केला मोठा खुलासा!
मनोज जरांगेंना मोठा झटका; रुग्णालयातून सलाईन काढून जरांगे तातडीने अंतरवालीकडे रवाना, नेमकं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील ‘या’ पक्षाचे उमेदवार असणार; भाजप नेत्याचा मोठा गौप्यस्फोट