दिल्लीमधील तबलीघींच्या मरकझमध्ये नेमकं काय चालतं???

नवी दिल्ली | राजधानी नवी दिल्लीतल्या निझामुद्दीनमधील तबलीघी जमात मरकझमध्ये सहभागी झालेल्या लोकांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या मरकझीमध्ये नेमकं काय चालतं, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

तबलीघी जमातीशी संबंधित लोक संपूर्ण जगात इस्लाम धर्माचा प्रचार आणि प्रसार करतात. छोट्या छोट्या व्यक्तींचे गट निझामुद्दीनमध्ये येतात. त्यानंतर तिथून हे गट देशाच्या अनेक भागांमध्ये जातात. जेथे जेथे ते जातात तेथील मशिंदींमध्ये हे गट थांबतात. तेथे हे गट स्थानिक लोकांना नमाज पढणे आणि इस्लाम धर्मातील इतर शिकवणींचे पालन करण्यास सांगतात.

तबलीघी जमातीशी संबंधित दिल्ली आणि परिसरातील लोक येथे येतात. दर जुमेरातीला इथे बैठकांचं आयोजन केलं जातं. या बैठकीमध्ये एकत्र बसून लोक धर्मावर चर्चा करतात. तसंच महिन्यातून एकदा येथे मोठी बैठकही पार पडते. या बैठकीला 2 ते 3 हजार लोक उपस्थित असतात.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इथे जर हजारो लोक उपस्थित राहिले तर सोशल डिस्टन्सिंग पाळणे अशक्य असल्याचं म्हटलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या –

-खलनायक ठरलेले मौलाना साद कोण आहेत? त्यांना एवढा मान का? वाचा संपूर्ण माहिती

-माझा नवराच मला समलैंगिक समजत होता- सनी लिओनी

-रैनाने दिलेल्या मदतनिधीवर पंतप्रधान मोदी म्हणाले…

-आता चिंता अधिक वाढली; कोरोनामुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

-“कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात आणीबाणी लागू करावी”