टाटा आणि मारुतीच्या CNG गाड्यांमध्ये काँटे की टक्कर, ‘ही’ देते जबरदस्त मायलेज

नवी दिल्ली | तंत्रज्ञानाच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात आज नवीन काही तरी घडत आहे. तंत्रज्ञान बदलायला लागलं की माणसांच्या सवयी देखील बदलायला लागतात. मग धावत्या जगात धावणाऱ्या गाड्यांमध्ये देखील तंत्रज्ञानानं बदल केला आहे.

चार चाकी गाडीचा आतापर्यंतचा प्रवास हा थक्क करणारा आहे. डिझेल, पेट्रोल, इलेक्ट्रीक गाड्या आता बाजारात उपलब्ध आहेत. ग्राहकांना आपल्या गाडीकडं आकर्षित करण्यासाठी भारतीय वाहन बाजारात मोठी स्पर्धा सध्या पहायला मिळत आहे.

ग्राहकांच्या विश्वासाची भारतीय कंपनी म्हणून टाटा कंपनीने आपली ओळख प्रस्थापित केली आहे. तर भारतीय बाजारात आकर्षक गाड्यांच्या माध्यमातून विशेष ओळख निर्माण करणारी मारूती कंपनी देखील ग्राहकांच्या पसंतीची आहे.

अशात टाटा आणि मारूती या दोन्ही कंपन्यांनी आपापल्या सीएनजी गाड्या भारतीय बाजारात उतरवल्या आहेत. मारूती कंपनीची सेलेरिओ तर टाटाची टीयागो या गाड्या ग्राहकांचं आकर्षण ठरत आहेत.

दोन्ही गाड्यांच्या काही खास फिचरबद्दल सध्या जोरदार चर्चा चालू आहे. कोणती गाडी अधिक चांगली अशी चर्चा आहे. मारूती सेलेरीओ ही पेट्रोल व्हेरियंटमधील सीएनजी आहे. तर टाटा टियागो देखील पेट्रोल व्हेरियंटची आहे.

मारुती सेलेरियो सीएनजी पेट्रोल व्हेरियंट प्रमाणेच 1.0 लिटरच्या 10 ड्युअलजेट इंजिनसह उपलब्ध आहे. पण सीएनजीसह ते कमाल 57 किमीची पॉवर आणि 82.1 चा पीक टॉर्क निर्माण करते. तर टाटा टीयागो 1.2 लिटर रेवोट्राॅन 3 सिलिंडर इंजन आहे. 74.4 मैक्स पाॅवर जनरेट करते.

टियागो ही सेलेरीओ पेक्षा अधिक चांगल्या पद्धतीनं खराब रस्त्यावर देखील चालण्यास सक्षम आहे. सेलेरीओची लांबी 3.6 मीटर तर टीयागोची लांबी 3.7 मीटर आहे. सेलेरीओ ग्राऊंड क्लिअरेंस 165 एमएम तर टीयागो ग्राऊंड क्लिअरेंस 168 एमएम आहे.

टाटा टीयागो गाडी सर्वोत्तम सुरक्षा संसाधनांच्या वापरानं बनलेली आहे. गॅस लिकीज व्हायच्या स्थितीत असेल तर गाडी आपोआप पेट्रोलमध्ये स्विच होईल. अॅव्हरेजच्या बाबतीत मात्र मारूती कंपनीची सेलरीओ टाटाच्या टीयागोला मागं टाकते.

सेलेरीओ एक किलो गॅसमध्ये 35.60 किमी धावते तर टाटा टीयागोबद्दल अशी अधिकृत माहिती नाही पण, साधारणपणे 26.49 या मायलेज प्रमाणे टीयागो धावते. मारूती सेलेरीओ एकाच माॅडेलमध्ये उपलब्ध आहे तर टीयागो ही चार माॅडेलमध्ये उपलब्ध आहे.

मारूती सलेरीओ 6.58 लाख रूपये किंमतीपासून उपलब्ध आहे. तर टीयागो ही 6.09 ते 7.52 लाख अशी माॅडेलनूसार किंमतीला उपलब्ध आहे. सध्या सीएनजी गाड्या घेण्यावर अधिकजण भर देत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

 बापरे बाप ‘डोक्याला’ ताप! Omicronची ‘ही’ लक्षणे महिनाभर दिसतात; वेळीच घ्या काळजी

उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी काँग्रेसला सर्वात मोठा धक्का, आता…

‘…अशा नामर्द माजोरड्या वृत्तीला वेळीच चिरडलं पाहिजे’; चित्रा वाघ संतापल्या 

संतापजनक! गर्भवती वनरक्षक महिलेला माजी सरपंचाकडून मारहाण, पाहा व्हिडीओ  

“देवेंद्र फडणवीस यांची अवस्था कुणी खुर्ची देता का खुर्ची अशी”