आपल्या पिलासाठी ‘या’ अस्वलाने फोडला टाहो! व्हिडीओ पाहून तुम्हालाही अश्रू अनावर होतील

बुलढाणा | सोशल मीडियावर अनेक वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ आपलं मनोरंजन करून जातात. तर काही व्हिडीओ आपल्याला एक चांगली शिकवण देऊन जातात. सध्या सोशल मीडियावर असाच एक मादी अस्वलाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही अश्रू अनावर होतील.

जगात आई आणि मुलाचं नातं हे सर्वात श्रेष्ठ मानलं जातं. मानव असो किंवा प्राणी प्रत्येकंच आईचं आपल्या मुलावर प्रेम सारखं असतं. अनेक महात्म्यांनी आईच्या वात्सल्याच्या थोरवी देखील लिहून ठेवल्या आहेत. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये आई आणि तिच्या पिलाच्या याच वात्सल्याची प्रचिती येते.

व्हायरल होणारा व्हिडीओ बुलढाण्यातील ज्ञानगंगा या अभयारण्यातील आहे. या व्हिडीओमध्ये एक मादी अस्वल आपलं पिलू दूर गेल्यानं त्याला टाहो फोडून शोधताना दिसत आहे. काही वनाधिकाऱ्यांनी ही घटना कॅमेऱ्यात कैद केली आणि सोशील मीडियावर शेअर केली. यानंतर आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा या अभयारण्यात अस्वल, बिबटे, तरस, रानडुक्कर असे अनेक वेगवेगळे प्राणी आहेत.  अभयारण्य जवळपास 20 हजार हेक्टर परिसरात पसरलं आहे. हे अभयारण्य अस्वलांचं माहेघरंच समजलं जातं.

अभयारण्यात वनाधिकाऱ्यांची नेहमीच गस्त असते. असंच आज वन अधिकारी अभयारण्यात पेट्रोलिंगसाठी गेले होते. यावेळी या अधिकाऱ्यांना एक अस्वल वेगळ्याच आवाजात ओरडताना दिसले. अधिकाऱ्यांना हे मादी अस्वल जंगलात काहीतरी शोधत असल्याचं लक्षात आलं.

तितक्यात दुसऱ्या बाजूने छोटं अस्वलाचं पिलू त्या अस्वालकडे धावत येताना दिसलं. आईचा आवाज कानावर पडताच हरवलेलं हे पिलू आईच्या दिशेनं पळत येत होतं. आपल्या पिलाला पाहून हे मादी अस्वल अधिक जोरजोरात ओरडू लागलं.

यावेळच्या त्या दृश्यविषयी बोलताना बुलढाण्यातील हे वनाधिकारी म्हणाले की, पिलू ज्यावेळी आपल्या आईजवळ गेलं त्यावेळचं दृश्य शब्दात व्यक्त होणारं नाही. ते फक्त डोळ्यात साठवून ठेवावं वाटणारं दृश्य होतं.

दरम्यान, अस्वल हा काहीसा आक्रमक प्राणी म्हणून ओळखला जातो. या आक्रमक प्राण्याच्या ममतेचा हा क्षण भावूक करणारा आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना अश्रू अनावर होत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ अभिनेत्रीनं मोराच्या जवळ जाण्याचं धाडस केलं पण चांगलंच अंगलट आलं, पाहा व्हिडीओ

पोलीस पतीला हॉटेलच्या खोलीत प्रियकरासोबत आढळली पत्नी, अन् मग…; व्हिडीओ व्हायरल

‘ही’ तरुणी चक्क नग्नावस्थेत डोंगर सर करते! जाणून घ्या काय आहे कारण?

चेहऱ्या ऐवजी ‘या’ ठिकाणी मास्क लावल्यामुळे महिला होतीय सोशल मीडियावर ट्रोल

जाणून घ्या! तुम्हाला कोरोना होऊन गेलाय की नाही हे कसं…