प्रभू रामचंद्रांचा चीनी ड्रॅगनवर निशाणा; ‘या’ देशातील वेबसाईटवर झळकला फोटो!

चीनने भारताचा पुन्हा विश्वासघात केला. गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांवर चीननं भ्याड हल्ला केला. ज्यामध्ये भारताच्या २० जवानांना वीरमरण आलं. या घटनेमुळं देशभर संतापाची लाट उसळली आहे. चीनी मालावर बहिष्कार, देशभर झालेली आंदोलनं यावरून लोकांचा जनप्रक्षोप वाढतच असल्याचं पहायला मिळतंय.

पंतप्रधान मोदींनीही चीनला चोख प्रत्युत्तर देऊ असा इशारा दिलाय. सोशल मीडियावर तर चीन विरूद्ध मोहिमाच राबविल्या जात आहेत. अशा तापलेल्या वातावरणात भगवान श्रीराम व चीनी ड्रॅगनचा एक फोटो प्रचंड व्हायरल होतोय. चीन किंवा भारतात नव्हे तर चक्क तैवान देशातील वेबसाइट्स वर हा फोटो झळकला आहे.

taiwan 1

फोटोमध्ये भगवान श्रीराम व चीनी ड्रॅगन आमने सामने असल्याचं दिसतय. भगवान श्रीरामांनी आपला बाण चीनी ड्रॅगनवर रोखून धरला आहे. भारताकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर गय केली जाणार नाही. असा निर्वाणीचा इशाराच जणू चीनला भगवान राम देत आहेत की काय असा अर्थ फोटोतून अभिप्रेत होतोय.

हाॅगकाॅग मधील सोशल मीडिया वेबसाईट LIHKG कडून हा फोटो सुरूवातीला ट्विट करण्यात आला. चीन व भारत सीमेवरील तणावाच्या पार्शवभूवीर हा फोटो चपखल बसत असल्यानं हा फोटो प्रचंड व्हायरल होतोय. भारतीयांकडून या फोटोला मोठ्या प्रमाणात रिट्वीट केलं जातंय.

taiwan

तैवान न्यूज कडून भारत व चीनच्या युद्धजन्य परिस्थितीवर लेख लिहिण्यात आला होता. या लेखात भगवान राम व ड्रॅगनचा हा फोटो छापण्यात आला. या लेखाचा आधार घेत LIHKG वेबसाइट्सने हा फोटो ट्विटरवर टाकला. अगदी काही तासांतच तैवान न्यूजच्या फोटोनं सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला.

 

भगवान श्रीराम चीनच्या ड्रॅगनचा वध करतानाचा हा फोटो तैवानला टाकण्याची गरज काय? असा प्रश्न आपल्याला पडला असावा. खरंतर तैवान व चीन या दोन्ही देशांतही १९४८ पासून तणाव कायम आहे. तैवानचे नागरीक चीनचा अगदी कडवा विरोध करत असतात. म्हणून भारत व चीनच्या दरम्यान हिंसक झडप पहायला मिळाली. तेव्हा तैवान भारताच्या बाजूला आहे असं बोललं जात आहे.

ram

तैवान न्यूजनं घेतलेल्या भूमिकेबद्दल भारतीयांकडून मात्र कौतुकाचा वर्षाव होतोय. तैवानचे कसे आभार मानावं हे समजत नाहीये असं गप्पीस्तान रेडीयो या युजर्सनं ट्विट केलंय. काही युजर्स तैवान न्यूजच्या लेखातील फोटोचा स्किनशाॅट काढूनही आभार व्यक्त करत आहेत.

 

तैवान न्यूजच्या या फोटोवर We Conquer We kill म्हणजेच ‘आम्ही नष्ट करतो व वधही’ असं छापण्यात आलं आहे. फोटोच्या वरील बाजूस भगवान राम ड्रैगनवर आक्रमण करत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. चीनच्या आक्रमणाला भारत अगदी चोख प्रत्युत्तर देण्यास समर्थ आहे. असं अप्रत्यक्ष सांगताना तैवान न्यूजनं भारताला पाठिंबाच दाखविला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळांची केंद्राकडे ‘ही’ विशेष मागणी, केंद्राच्या भूमिकेकडे लक्ष

-राज्य सरकारच्या खात्यात जमा झाले एकाच दिवशी तब्बल 6500 कोटी, कसे ते बघा…

-दररोज किती परप्रांतीय महाराष्ट्रात येतात? गृहमंत्र्यांनी सांगितला आकडा

-फडणवीसांना तो धोका आणखी दिसतोय, उद्धव ठाकरेंना लिहिलं पत्र

-प्रकाश आंबेडकरांनी अरविंद बनसोडच्या कुटुंबियांची घेतली भेट, दिला ‘हा’ शब्द