Top news महाराष्ट्र मुंबई

“इंदुरीकरांवर कारवाई करा अन्यथा…”; तृप्ती देसाई पुन्हा आक्रमक

indurikar and desai e1642091611605

मुंबई | राज्यात आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण करणारे निवृत्ती महाराज इंदुरीकर अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं वादात अडकले आहेत.

आताही इंदुरीकर महाराजांनी कोरोनाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. परिणामी राज्यभरातून विविध स्तरातील व्यक्ती त्यांच्यावर टीका करत आहेत. महाराजांवर कारवाईची मागणी करत आहेत.

मी माळकरी आहे म्हणून मला कोरोना होणार नाही आणि माळ काढणाऱ्यांना कोरोना गाठणारचं, असं कीर्तनाच्या माध्यमातून इंदुरीकर महाराजांनी सांगितलं होतं. त्यानंतर राज्यात वाद वाढला आहे.

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी ठाकरे सरकारनं इंदुरीकर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. परिणामी सध्या वाद वाढला आहे.

इंदुरीकर आपल्या अशा वक्तव्यामुळं राज्यात अंधश्रद्धा पसरवत आहेत. कोरोनाच्या परिस्थितीत राज्यात मोठ्या प्रमाणात रूग्ण वाढत असताना इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यांनं राज्यात गोंधळ माजला आहे.

कोरोना ही महाभयंकर महामारी असून सध्या तिसरी लाट आपल्या देशात आहे. याआधी अनेकजणांना कोरोनामुळे मृत्यूला सामोरं जावं लागलं आहे तर अनेक जण मृत्यूच्या दारातून बाहेर आले आहेत, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

राज्य सरकार सुद्धा जनजागृती करत आहेच, परंतु स्वतःला कीर्तनकार म्हणविणारे इंदुरीकर पुन्हा एकदा असं वक्तव्य करून अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत, असं देसाई म्हणाल्या आहेत.

सरकारमधील नेते आणि विरोधी पक्षातील नेते यांनी ठेवलेल्या प्रवचनाला इंदुरीकर यांना बोलविले जाते आणि गर्दी जमा होते, आता लवकरच निवडणुका आहेत केवळ म्हणूनच दरवेळी त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न या सर्व नेत्यांकडून केला जातो, असा आरोप सरकारवर देसाई यांनी केला आहे.

याआधी सुद्धा त्यांच्या कोरोनावरील वक्तव्यावर सरकारने कोणतीही कारवाई न करता सूट दिली होती परंतु हिम्मत असेल तर आणि आपल्या राज्यात सर्वांना कायदा समान असेल तरच या सरकारने इंदुरीकरांवर त्यांनी केलेल्या वक्तव्यावर गुन्हा दाखल करावा. अन्यथा अंधश्रद्धा पसरवण्यात सरकारसुद्धा सामील आहे, असं जनतेला वाटेल, असंही देसाई म्हणाल्या.

दरम्यान, देसाई यांनी इंदुरीकर महाराजांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात महाराजांची कीर्तनं ऐकली जातात. परिणामी आता सरकार काय करतं ते पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

5 वर्षांची चिमुकली रिपोर्टर पाहिलीत का?; पाहा हफिजाची रिपोर्टिंग

श्रेयवादाची लढाई सुरू! राज ठाकरेंचा ‘तो’ जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ; ‘या’ प्रकरणात अंजली दमानिया पुन्हा आक्रमक

भारतातील कोरोना स्थितीबाबत अमेरिकेतील तज्ज्ञांचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

‘… तर घरीच उपचार घ्या’; जाणून घ्या सरकारच्या या मार्गदर्शक सूचना