संजय राऊतांवर ‘त्या’ प्रकरणी कारवाई करा, भाजप नेत्याचा हल्लाबोल!

मुंबई | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्षातील नेते कोणत्या न कोणत्या कारणावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करत आहेत. सत्ताधारी पक्षाला टार्गेट करण्याचा एकही मुद्दा विरोधी पक्षातील नेते सोडत नाहीत.

अशातच आता पुन्हा एकदा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी कांजूरमार्ग मेट्रो कारशेडबाबत हायकोर्टाने दिलेल्या निर्णयावर टिप्पणी केली होती.

हायकोर्टाचा हा निर्णय दुर्दैवी आहे. ही जामीन महाराष्ट्राची, सरकार महाराष्ट्राचं मग हे मिठागरेवाले आले कुठून? महाराष्ट्रात भाजपचं सरकार नसल्यामुळे असे निर्णय घेतले जातात का? असा सवाल संजय राऊत यांनी हायकोर्टावर टिपण्णी करताना केला होता. संजय राऊत यांच्या याच वक्तव्यावरून प्रवीण दरेकरांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना राऊतांवर घणाघात केला आहे.

प्रवीण दरेकर यावेळी म्हणाले की, संजय राऊत यांची वक्तव्ये बेताल आणि बेजबाबदार आहेत. आज तर थेट न्यायालयाने काय केलं पाहिजे हेच ते सांगत आहेत. राऊतांवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी.

आम्हाला सत्ता गेल्याच दुःख अजिबात नाही, कारण दोनवरुन 300 पर्यंत भाजपच्या खासदारांची संख्या पोहोचली आहे. त्यामुळे त्या गोष्टीची चिंता संजय राऊतांनी करु नये.

तसेच संजय राऊतांनी कोर्टावर असं भाष्य करणे हा कोर्टाचा अवमान आहे. सर्वोच्च न्यायव्यवस्था असताना त्यांच्यावरच असे आरोप करणे चुकीचं आहे. यामुळे संजय राऊत यांच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

धक्कादायक! पुण्यात अ.टक केलेल्या ‘या’ माजी आमदाराला जबर मारहाण; व्हिडिओ व्हायरल

‘अजित पवार तुम्ही रडता, फोन बंद करून लपून बसता आणि…’; निलेश राणेंचा अजित पवारांवर घणाघात

महिन्यात सलग दुसऱ्यांदा गॅस सिलिंडरचे दर वाढले, वाचा आजचा दर

भाजपच्या नगरसेवकांचा राडा! डोक्यात हेल्मेट घालून नगरसेवकांनी केलं ‘हे’ अजब कृत्य; पाहा व्हिडिओ

“भाजपमध्ये दहापेक्षा अधिक आमदार नाराज असून राष्ट्रवादीत लवकरच मेगाभरती होणार आहे”