“पुण्यातील ससून रुग्णालयाच्या प्रमुखावर कारवाई करा”

पुणे | पुणे शहरात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू ससून रुग्णालयात झाले असून, त्यासाठी रुग्णालय प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने ससून रुग्णालयाच्या प्रमुखांवर कारवाई करावी, अशी मागणी महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

कोरोनामुळे ससून रुग्णालयात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावताना निष्काळजीपणा करण्यात आला आहे. या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवालाही उशिरा देण्यात आला. त्यामुळे तो रुग्ण राहत असलेल्या परिसरात करोनाचा संसर्ग वाढला असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला आहे. अरविंद शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे.

कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यामृतदेहाची विल्हेवाट शासनाच्या गाईडलाईन नुसार होत नाही , त्यामुळे करोना संसर्गाचा धोका निर्माण होतोय,हे सुद्धा पत्रात नमूद केलेले आहे.

दरम्यान, रुग्णालयांर्तगत तसेच बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध विभाग प्रमुखांमध्येही मोठ्या प्रमाणात नाराजी असून, अशा आपत्कालीन परिस्थितीत ससूनचे प्रमुख संयमीपणाने कामं करत नाहीत. त्याचा फटका रुग्णांना बसत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे.

92827940 2924313797664678 605458219707400192 n.jpg? nc cat=106& nc sid=b96e70& nc ohc=OFqIjcq3issAX8X9Q3x& nc ht=scontent.fnag1 2

 

महत्वाच्या बातम्या 

-चीनमध्ये पुन्हा कोरोनाचे रूग्ण; तिघांचा गेला बळी

-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमदार होण्यास आमचा विरोध नाही पण…

-“अन्नदात्यांच्या मुलांना आपल्या मुलांप्रमाणे समजा त्यांच्याकडून रूम भाडं घेऊ नका”

-लॉकडाउनदरम्यान प्रेमी युगुल घरातून पळालं पण….

-कल्याण-डोबिंवलीत यंत्रणा अपूरी पडते, आरोग्य मंत्र्यांनी धारावीसारखी पाहणी करावी- राजू पाटील