मुंबई | कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्राॅनने (Omicron) जगाचं टेन्शन वाढवलं आहे. दिवसेंदिवस ओमिक्राॅनच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
अशातच मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशातच आता भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना कोरोनाच्या ओमिक्राॅनची लागण झाली आहे.
पंकजा मुंडे यांना याआधी देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता त्यांना ओमिक्राॅनची बाधा झाली आहे. त्यामुळे आता पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.
अशातच पंकजा मुंडे यांचे बंधू आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांन मॅसेज करत काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
मी पंकजाताईंला फोन तर करू शकलो नाही, असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं. मी त्यांना मात्र मेसेजद्वारे काळजी घेण्याची विनंती केल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.
पोस्ट कोविड होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे तब्येतीची काळजी घेण्याची गरज आहे, असं मी त्यांना सांगितलं असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय.
कोरोना संपलेला नाही. नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडावं अन्यथा घरातच राहावं. गर्दीच्या ठिकाणी जाणं शक्यतो टाळा, मास्क आणि सेनिटायझरचा वापर करावा, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी नागरिकांना दिला आहे.
दरम्यान, जनोम सिक्वेंसिंगच्या चाचणीनुसार त्यांनी ओमिक्राॅनची बाधा झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांची प्रकृती चांगली असल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
“…म्हणून त्यांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी बसवलं”
कोरोनाचा हाहाकार! ‘या’ राज्यात उद्यापासून शाळा-काॅलेज बंद, नाईट कर्फ्यू लागू
तज्ज्ञ म्हणतात, ‘ओमिक्राॅनमुळे फायदाच होणार’; कसं ते वाचा सविस्तर
रवी गोडसे म्हणतात, “ओमिक्राॅन ही वाईट बातमी पण…”
Sulli डील, Bulli डील- नेमका हा प्रकार आहे तरी काय?