कोरोनाप्रतिबंधक लस घेतल्यानंतर ‘या’ गोष्टी करू नका, नाहीतर होऊ शकतो कोरोनाचा संसर्ग

गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्ग रोगाने थैमान घातलं आहे. मागील काही महिन्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतू फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतं आहे.

सगळीकडे आता कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत खूप जास्त प्रमाणात वाढ होत आहे. याच महाभयंकर आजाराला आळा घालण्यासाठी सगळीकडे कोरोनोप्रतिबंधक लस द्यायला सुरूवात झाली आहे.

लस घेतल्यानंतर आपल्याला कोरोना होणारच नाही. असं बऱ्याच जणांना वाटतं. मात्र लस घेतल्यानंतरही काहींना कोरोनाची लागण झाल्याच्या अनेक केसेस आपण पाहिल्या आहेत. त्यामुळे काहींच्या मनात भिती बसली आहे. परंतू लस घेतल्यानंतर तुम्हाला कोरोनाची लागण होणारच नाही, याची खात्री दिलेली नाही. तज्ञांच्या माहितीनूसार लस घेतल्यानंतर काही चूका आपण केल्यातर आपल्याला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो.

लस घेतल्यानंतर मास्क न लावणं- लस घेतल्यानंतर बऱ्याच जणांना असं वाटतं की आता आपल्याला कोरोना होणार नाही. त्यामुळे आपण मास्क नाही लावलं तरी चालेलं. परंतू हे बरोबर नाही. लस घेतल्यानंतरही आपण मास्क लावले पाहिजे.

तरीही एखादा व्यक्ती लस घेतल्यानंतर मास्क लावत नसेल, तर त्याला कोरोना होण्याचे खूप शक्यता असते. कारण लस तुम्हाला कोरोना होणारच नाही, याती शाश्वती देत नाही. त्यामुळे मास्क लावले खूप आवश्यक आहे.

प्रवास करू नये- लस घेतल्यानंतर अनेकांना असं वाटतं की, आता आपण काहीही करण्यास, कुठेही फिरण्यास मोकळे झालो आहोत. त्यामुळे अनेकदा गर्दीमध्ये गेल्यानंतर काळजी न घेतल्यामुळे इतरांकडून कोरोनाचे विषाणू आपल्यावर हल्ला करू शकतात.

तज्ञांचा असं मतं आहे की, जोपर्यंत अधिकाधिक लोक लसीकरण करत नाहीत, तोपर्यंत आपण  प्रवासाला आळा घातला पाहिजे. कोणत्याही ठिकाणी विनाकारण जाणे टाळले पाहिजे. अजूनही आपल्यावर कोरोनाचे संकट कायम आहे. त्यामुळे लस घेतल्यानंतरही सर्व नियमांचे पालन करणे गरजेचं आहे.

आधी कोविड झाला आहे म्हणून लस न घेण्याची चूक- अनेकांना असे वाटतं की, आपल्याला कोरोना होऊन गेला आहे. त्यामुळे मला परत होऊ शकत नसल्याने मी लस नाही घेतली तरी चालू शकतं. परंतू हे चूकीचं आहे. तुम्हालाही कोरोना होण्याचा धोका असतो. जर तुम्ही लस घेतली नाहीतर दुसर्‍या वेळी कोरोनाच्या गंभीर लक्षणांपासून ग्रस्त होऊ शकता.

महत्वाच्या बातम्या-

जाणून घ्या!कोरोना काळात वर्क फ्रॉम होम करताना, वजन कमी…

…म्हणून कोरोना पॉझिटिव्ह आजी-आजोबांनी ट्रेन समोर उडी…

चक्क जावयासोबत सासू गेली पळून, त्यानंतर जे घडलं ते ऐकून…

वाह! ‘वदनी कवल घेता…..’ म्हटल्याशिवाय…

IPL 2021: के. एल. राहूलऐवजी ‘हा’ खेळाडू झाला…