मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा ठाण्यात सभा घेऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांवर तोफ डागली आहे. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना राज ठाकरे यांनी निशाण्यावर घेतलं.
राज ठाकरे यांनी हिंदूत्वाची भूमिका मांडल्यानंतर आता अनेक राज ठाकरे यांचं नाव देशभर गाजत असल्याचं पहायला मिळतंय. याचा प्रत्यय आज उत्तर सभेदरम्यान पहायला मिळाला.
आजच्या सभेसाठी फक्त महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून लोक आल्याचं दिसलं. राज ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी एक व्यक्ती अयोध्येतून आला होता.
हा व्यक्ती चक्क हनुमानाची वेशभूषण धारण करून सभेसाठी आला होता. मनसेचे पदाधिकारी तुलसी जोशी यांनी याला अयोध्येवरून आणलं होतं. तो राज ठाकरेचा मोठा फॅन असल्याचं सांगितलं जातंय.
त्याच्या अजब गेटअपमुळे पोलिसांनी सभेआधी त्याला ताब्यात घेतलं. त्यामुळे त्याला राज ठाकरे यांची सभा ऐकता आली नाही.
दरम्यान, मी राज ठाकरे यांचा फॅन आहे. हिंदूत्वाच्या मुद्द्यावर राज ठाकरे चालत असल्याने आम्हाला ते बाळासाहेब ठाकरे यांचे रूप वाटतात, असं या व्यक्तीने म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘ये शेपटं धरतो, गरगर फिरवतो फेकून देतो’; राज ठाकरे आव्हाडांवर बरसले
राज ठाकरे यांची सुप्रिया सुळेंवर घणाघाती टीका, म्हणाले…
“शरद पवारांच्या घरी एसटीचे लोक जाणार, हे इंटेलिजन्सला कळलं कसं नाही?”
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली महत्त्वाची माहिती
Kirit Somaiya: वादात अडकलेल्या किरीट सोमय्यांना आठवले गोपीनाथ मुंडे, म्हणाले…