सेकंड हँड कार घेताय? मग ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

प्रत्येकालाच 4 ते 5 लाखांची नवीन गाडी घेणे शक्य होत नाही. कारण अगोदरच घराचा हप्ता डोक्यावर असतो. अशा वेळेला सेकंड हँड गाडी ‘कॅल्क्युलेटेड रिस्क’ म्हणून किंवा फर्स्ट बायर म्हणून घेत असतो. तर काही तरुण क्रेझ म्हणून, हौस म्हणून एसयूव्ही किंवा मोठय़ा ब्रॅण्डच्या गाडय़ांचा आनंद थोडय़ा पैशात घेण्यासाठी सेकंड हँड गाडय़ा घेतात. मात्र सेकंड हँड गाडी घेताना नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत अनेकांना माहिती नसते.

अनेकांचे बजेट कमी असल्यानं सेकंड हॅन्ड कार खरेदी करताना दिसतात. मात्र काही कालावधीनंतर या गाडीमध्ये अडथले येऊ लागतात. कार दुरुस्तीसाठी पून्हा पैसे खर्च करावे लागतात. म्हणजे येऊन एकच होऊन जातं. नवीन कार एवढेच पैसे चालले जातात. त्यामुळे सेकंड हॅन्ड कार खरेदी करताना या गोष्टींची नेहमी काळजी घ्या.

नो वॉरंटी – जर कार मालकाकडे कारची वॉरंटी नसेल तर ती गाडी घेण्याचं टाळावं. गाडी मालकाकडे गाडीची वॉरंटी असेल तर ती योग्य आहे का? हे तपासून पहावं.

इंस्पेक्शन शिवाय गाडी घेऊ नये – जर कार मालक आपल्याला कार चेक करण्याची परवानगी देत नसेल तर गाडीमध्ये काहीतरी करतरता असण्याची शक्यता असते. त्यामुळे गाडी घेण्याचं सहसा टाळावं.

सर्व्हिस रेकॉर्ड – कारचे सर्व्हिस रेकाॅर्ड, रजिस्ट्रेशन, इन्शुरन्स तपासून घ्या. कारच्या मालकाकडे सर्व्हिस रेकॉर्ड नसल्यास आपण कार घेण्याचं टाळावं. वाहनाचे कोणते भाग बदलले आहेत हे आपल्याला कळू शकणार नाही. त्याच वेळी, आपण कारच्या मालकास कारची किंमत कमी करण्यास देखील सांगू शकता.

टेस्ट ड्राइव्ह – सेकंड हॅन्ड कार घेताना टेस्ट ड्राइव्ह घ्या. ती किमान 10 किलोमीटरची असावी. कारचे सर्व फिचर्स तपासून पाहा.

ओडोमीटरचं चुकीचे रीडिंग – ओडोमीटरचं रीडिंग चुकीचं किंवा विचित्र दिसलं तर तुम्ही त्वरित कार मालकास नकार द्यायला हवा. त्याच वेळी, तुम्ही कार चालवून पाहावी. कारण बर्‍याच वेळा ओडोमीटर कारचे अचूक रीडिंग सांगत नाही.

महत्वाच्या बातम्या – 

गृहमंञी अनिल देशमुखांच्या राजीनाम्याबद्दल शरद पवारांचा मोठा…

सुंदर त्वचेसाठी बटाटा आहे खूपच गुणकारी, जाणून घ्या…

2020 आयुष्यातील सर्वात वाईट काळ; अखेर सुशांतच्या मृत्यूवर…

‘रिप्ड जीन्सची सर्वांनाच चिंता या रिप्ड शर्टचं…

‘विवाहित पुरुषाच्या प्रेमात कधीच पडू नका’…