चर्चा तर होणारच! ‘या’ विद्यार्थ्यानं बनवला ‘माईकवाला मास्क’, चार्जिंग करुन करता येणार वापर

नवी दिल्ली| कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात थैमान घातलंय. देशात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूचं प्रमाण या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेची शक्यताही तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचं अक्षरशः तांडवच बघायला मिळत आहे. देशाच्या विविध भागात कोरोनाने हातपाय पसरले असून, रुग्णसंख्येचा तोल सांभाळताना आरोग्य व्यवस्था डगमगताना दिसत आहे.

अशातच मास्क असल्याशिवाय घराबाहेर पडणेही कठीण बनलंय. या परिस्थिीचा सामना करताना, अनेकजण नवनवीन वस्तू पहायला मिळत आहेत. मास्कचेही विविध प्रकार आपण अनुभवले आहेत. आता, माईकवाल्या मास्कची निर्मिती एका केरळमधील तरुणाने केली आहे.

केरळच्या त्रिशूर सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयात बीटेकच्या प्रथम वर्षाला असणाऱ्या केविन जेकब याने एक मास्क तयार केला आहे. मास्क घातल्यानंतर सहजपणे संवाद साधता यावा, यासाठी त्यामध्ये माईक आणि स्पीकरची सुविधा देण्यात आली आहे. विशेषत: डॉक्टर्स आणि इतर आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लक्षात घेऊन या मास्कची निर्मित्ती करण्यात आली आहे.

केविनचे आई-वडिल दोघेही डॉक्टर आहेत, त्यामुळे त्यांना बोलताना होणारा त्रास लक्षात आल्याने केविनने या मास्कच्या निर्मित्तीसाठी प्रयत्न केले.

विशेष म्हणजे या प्रयोगात तो यशस्वीही झाला. त्यानंतर, सर्वप्रथम स्वत:च्या आई-वडिलांनाच त्याने हे मास्क वापरण्यास दिले होते. डॉ. सेनोज केसी आणि डॉ. ज्योती मेरी जोस यांनीही मास्क परिधान करुन कंम्फर्ट असल्याचे सांगितले. त्यामुळे, आता या मास्कच्या मागणीनुसार आपण मास्कची निर्मित्ती करणार असल्याचं केविनने एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले.

केविनने या मास्कमधील माइक आणि स्पीकरचा वापर व्हावा म्हणून त्याला बॅटरी बसवली आहे. ही बॅटरी अर्ध्या तासात चार्ज होते आणि चार ते सहा तास हा मास्क नीट वापरता येतो. लोहचुंबकाचा वापर करून ही बॅटरी मास्कला जोडली आहे.

केविनने अशाप्रकारचे 50 मास्क तयार केले आहेत. केरळमधील अनेक डॉक्टर्स सध्या त्याचा उपयोग करत आहेत. ‘ मला मोठ्या प्रमाणात मास्क तयार करायचे आहेत पण सध्या माझ्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे एखादी व्यक्ती किंवा कंपनीने मला मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी मदत केली तर अनेक लोक या नव्या मास्कचा वापर करू शकतील.’ असं केविन म्हणाला.

 

महत्वाच्या बातम्या – 

कौतुकास्पद! मोठ्या पगाराची नोकरी सोडून महिला स्मशानात करतेय…

धक्कादायक! कोरोना नष्ट करण्यासाठी देवाला सोडलेल्या घोड्याचा…

2 वर्षाच्या चिमुरड्यासह विवाहित प्रेयसी पोहोचली थेट…

‘या’ विवाहित दिग्दर्शकाला हृदय देऊन बसली होती…

चिमुकलीचा ‘हा’ व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल चकीत