मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! ‘या’ राज्यात लागणार संपूर्ण लाॅकडाऊन

चेन्नई | कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेनं धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. यातच कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्राॅननं चिंतेत भर पाडली आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रूग्णसंख्या जरी मोठ्या प्रमाणावर वाढत असली तरी रूग्णांना रूग्णालयात भरती करण्याचं प्रमाण मात्र खूप कमी आहे.

देशात कोरोनाची तिसरी लाट आली असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे केंद्राने राज्यांना काही सुचना देखील दिल्या होत्या.

अशातच आता देशात लाॅकडाऊन लागणार की काय? अशी चिंता सर्वांना होती. त्यानंतर आता तमिळनाडू सरकारने लाॅकडाऊनची घोषणा केली आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी येत्या 23 जानेवारीला संपूर्ण राज्यात संपूर्ण लॉकडाऊन असल्याची घोषणा केली आहे.

त्यामुळे आता तिसऱ्या लाटेत संपुर्ण लाॅकडाऊन लावणारं तमिळनाडू हे पहिलं राज्य बनलं आहे. तमिळनाडूमध्ये सध्या 28 हजार नवीन रूग्ण आढळत असल्याचं दिसतंय.

दरम्यान, तमिळनाडूने लाॅकडाऊनचा निर्णय घेतल्यानंतर आता इतर राज्य कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘ही’ लस ठरतीये ओमिक्राॅनवर प्रभावी, संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर

 सेक्सनंतर डोकं दुखत असेल तर गांभिर्याने घ्या, जीवावरही बेतू शकतं

शरद पवार म्हणतात, “भाजपवाले कधीपासून गांधीवादी झाले…”

 …तर संपत्तीवर मुलींचा पहिला अधिकार, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

  Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा आजचे ताजे दर