महाराष्ट्र मुंबई

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय पण पंतप्रधान झालेलं पाहायचंय- तानाजी सावंत

पुणे |  मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना-भाजपात जोरदार कलगीतुरा रंगला आहे. मित्रपक्षाकडे बोलायची खुमखुमी असणारे नेते जरा जास्त आहेत, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला ठणकावलं. यावर शिवसेना नेते आणि मंत्री तानाजी सावंत यांनी भाजपला टोला लगावला आहे.

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय पण आम्हाला पंतप्रधान झालेलं पाहायला आवडेल, असं तानाजी सावंत म्हणाले आहेत. 

मित्रपक्षाने आम्हाला धमक्या देण्याच्या भानगडीत पडू नये. सत्तेचा माज उतरवण्याची ताकद शिवबंधनात आहे, अशा शब्दात सावंत यांनी भाजपला इशारा दिला आहे.

आमचं ठरलंय! युती असेल तर सोबत आणि नसेल तर एकला चलो रे… त्यामुळे उगी आम्हाला धमक्या देऊ नये, असंही सावंत म्हणाले आहेत.

मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना अभिमन्युसारखे चक्रव्यूहात अडकवण्यात आलं होतं. मात्र यावेळी शिवसेना गाफील राहणार नाही. ‘एकला चलो रे’ची आमचीही तयारी आहे, असं ते म्हणाले. 

दरम्यान, उस्मानाबादच्या सर्व सहाच्या सहा जागा शिवसेनाच जिंकणार असल्याचा दावाही सावंतांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पाकिस्तानला निघून जावं; ‘हा’ अभिनेता आझम खानवर भडकला

-राणेसाहेब… पराभवाची हॅट्रीक चुकवायची असेल तर निवडणूक लढवू नका; शिवसेनेचा सल्ला

-कर’नाटकावर’ उद्धव ठाकरेंचा सामनातून हल्लाबोल; म्हणतात…

“भाजपचा सत्तेचा माज जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही”

-काँग्रेसला मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश???

IMPIMP