नाम फाऊंडेशनला मिळणाऱ्या कोट्यावधींच्या देणग्यांचा पैसा जातो कुठे? – तनुश्री दत्त

मुंबई | बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या ‘नाम’ संस्थेने अभिनेत्री तनुश्री दत्ताविरोधात 25 कोटींचा मानहानीचा दावा केला आहे. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने तनुश्री दत्ताला ‘नाम’ सामाजिक संस्थेविरोधात आरोप लावण्यापासून मज्जाव केला आहे.

नाना पाटेकर यांनी नाम फाऊंडेशनच्या नावावर कोट्यावधींचा भ्रष्टाचार केला. त्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर भ्रष्टाचार केलाय, असा गंभीर आरोप तनुश्री दत्तने केलाय.

नाना पाटेकर यांनी नाम या संस्थेच्या नावाने परदेशातून कोट्यावधींच्या देणग्या घेतल्या. हा पैसा कुठे जातो? गरीब विधवांना वर्षातून एकदा साड्या वाटायचा आणि फोटो काढायचं की यांचं काम झालं, असं तुनश्रीे म्हणाली.

दरम्यान, नाना पाटेकर कोल्हापूर पूरग्रस्तांना 500 घरं देणार होते, त्याचं काय झालं? कोणी जाऊन बघितलं, असं तनुश्रीने म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या – 

-म्हणून पालकांनी लिहिलं मुख्यमंत्र्याना पत्र

-कोरोनाच्या झटका; आयपीएल संदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय!

-सावधान पुणेकरांनो…आणखी एक कोरोनाचा रूग्ण सापडला

फडणवीस की पवार, चांगला सहवास कुणाचा??; काकडे म्हणतात…

-‘शिवाजी’ ही तीन अक्षरे म्हणजेच उर्जेचा स्त्रोत; राज ठाकरेंचं शिवजयंतीनिमित्त खास ट्वीट