मनोरंजन

नाना पाटेकरांवर अभिनेत्री तनुश्री दत्ताचे अत्यंत धक्कादायक आरोप

मुंबई : अभिनेते नाना पाटेकर यांनी माझ्यासोबत गैरवर्तन केलं, असा धक्कादायक आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ताने लावला आहे. 2008 साली ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या सेटवर हा प्रकार घडला होता, असं तीनं सांगितलं आहे. झूम टीव्हीला तीने एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत एका प्रश्नावर बोलत असताना तनुश्री दत्ताने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. तनुश्री दत्ताच्या या मुलाखतीमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

Image result for Tanushree Dutta Emraan hashmi
आशिक बनाया चित्रपटात तनुश्री दत्ता 

बॉलिवूडमधील अनेक कलाकार गेल्या काही दिवसांपासून इंडस्ट्रीत आपल्याला सहन कराव्या लागलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटना सांगत आहेत.#Metoo हॅशटॅगचा वापर करुन अनेक अभिनेत्री आपल्यासोबत घडलेल्या गैरकृत्याच्या कहाण्या सांगत आहेत. तनुश्री दत्ताने देखील अशाच प्रकारे नाना पाटेकरांवर आरोप केले आहेत. 

सिनेमाच्या एका स्पेशल गाण्याचं शूटिंग सुरु होतं. नाना पाटेकरांचं काम नसताना ते सेटवर वावरायचे. मला ओढायचे, या गोष्टींचा मला त्रास होत होता. मी निर्माते आणि दिग्दर्शकांना या गोष्टीची कल्पना दिली. मला त्या माणसाचं वर्तन आवडत नाही त्याला माझ्यापासून दूर रहायला सांगा, असं मी त्यांना सांगितला. मात्र त्यावर काही झालं नाही, असं तनुश्री सांगते. 

दरम्यान, नानाला समज देण्याऐवजी त्याने एक नवीनच मागणी ठेवली. करारात सोलो डान्स असतानाही त्याने या गाण्यात माझ्यासोबत एक इन्टिमेन्ट सीन घेण्याची मागणी केली. नवीन कलाकार आहे तर काय, अशा अविर्भावात त्यांनी ही मागणी केली. नानांनी मला बाहुपाशात घेतलं. कोरिओग्राफर्सना दूर होण्यास सांगितलं. मिठीत घेऊन ते मला डान्स कसा करायचा सांगत होते. दूर सारुन डान्स कसा करावा, हे ते दाखवत होते. अखेर मी ते गाणं न करण्याचा निर्णय घेतला. तो अनुभव आठवून मी आजही दचकते, असं तनुश्रीने सांगितलं. 

IMPIMP