देश

शरद पवार यांनी घेतलेला तो निर्णय देखील चुकीचा होता!

नवी दिल्ली : राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर तारिक अन्वर यांच्या मनातील खदखद समोर यायला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीवेळी शरद पवारांनी भाजपला देऊ केलेला बिनशर्त पाठिंबा देखील चुकीचा होता, असं तारिक अन्वर यांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. मात्र त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे विरोधी आघाडीला फटका बसला आहे. वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला असेल तर पवारांनी स्वतः स्पष्टीकरण द्यायला हवं होतं, असं ते म्हणाले.

दरम्यान, सोनिया गांधींच्या विदेशीयत्वाच्या मुद्द्यावरुन काँग्रेस सोडण्याचा निर्णय देखील चुकीचा होता. तो आततायीपणे घेतलेला निर्णय होता. तसं नसतं तर राष्ट्रवादीला मोठं यश मिळालं असतं, असंही ते म्हणाले.