टाटा मोटर्सची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार बाजारात

नवी दिल्ली | देशातील वाढत्या इलेक्ट्रिक (Electric Vehicles) वाहनांची मागणी लक्षात घेता, टाटा मोटर्स (Tata Motors) कंपनीने बाजारातील आपली पकड मजबूत करण्यासाठी नवनवीन गाड्या बाजारात आणल्या आहेत.

टाटा मोटर्स इलेक्ट्रिक (EV) वाहनांमध्ये आणखी एक धमाका करण्याच्या तयारीत आहे. आज (दि. 28) कंपनी आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार टाटा टियागो (Tata Tiago) बाजारात आणत आहे.

टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहणांच्या पोर्टफोलिओमध्ये नेक्सॉन (Nexon) आणि टिगोर (Tigor) या दोन गाड्या पूर्वीपासून तर आहेत. आता टाटा टियागोची त्यात भर पडणार आहे. भारतीय बाजारात नेक्सॉन इलेक्ट्रिक कारची जबरदस्त विक्री होत आहे.

आता कंपनीने टाटा टियागो बाजारात आणून हॅचबॅक इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये देखील आपला दबदबा निर्माण करत आहे. टाटा मोटर्सने पुढील पाच वर्षात 10 नव्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

या नवीन गाडीची किंमत 10 लाख रुपयांच्या घरात असू शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. यात सर्वात महत्वाची बाब अशी की, ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असणार आहे.

तसेच ही नवीन गाडी एकदा चार्ज केल्यानंतर 300 किमीपर्यंतचे अंतर कापू शकते. या कारला 26KWH बॅटरी पॅक देण्यात येणार आहे. टाटा मोटर्स सध्या भारतात टायगोर ईवी या गाडीची सर्वात स्वस्त विक्री करत आहे.

टाटा मोटर्सच्या तुलनेत इतर गाड्या वीस लाखांच्या पुढे विक्री केल्या जात आहे. त्यामुळे ही नवीन गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

‘पीएफआय’बाबत किरीट सोमय्यांचा मोठा दावा; म्हणाले, या संघटनांना निधी…

‘शिवभोजनथाळी’बाबत मुख्यमंत्र्यांचा महत्वपूर्ण निर्णय

“…तोपर्यंत नरेंद्र मोदी मला संपवू शकत नाहीत”; पंकजा मुंडे यांचे पक्षाच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य

न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ‘कमळाबाई’ म्हणत भाजपची सामनातून केली पोलखोल

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया विरोधात केंद्राचा मोठा निर्णय’; बेकायदेशीर ठरवत पुढील…