मुंबई | आजकाल सोशल मीडियावर एक प्रश्न मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भारतातील सर्वात स्वस्त आणि सर्वात छोटी कार टाटा नॅनो पुन्हा एकदा देशाच्या रस्त्यांवर दणदणाट करण्यास तयार आहे का?.
रतन टाटा यांनी त्यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणून जगातली सर्वात स्वस्त कार टाटा नॅनो 2008 मध्ये लाँच केली होती. अवघ्या 1 लाख रुपयात ही कार बाजारात दाखल झाली होती. मात्र ही कार भारतीय ग्राहकांनी आपलीशी केली नाही. 2019 मध्ये कंपनीला या कारचं उत्पादन बंद करावं लागलं. मात्र आता पुन्हा या कारची चर्चा होण्यास सुरूवात झालीये.
टाटा नॅनो इलेक्ट्रिक कारचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. टाटा नॅनो इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जमध्ये 160 किमीची रेंज देते असं सांगितलं जातंय.
काही दिवसांपूर्वी टाटा सन्सचे अध्यक्ष आणि उद्योगपती रतन टाटा यांनी टाटा नॅनो इलेक्ट्रिक कारमधून प्रवास केला होता. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.
रतन टाटा आणि त्यांचे सहकारी शंतनू नायडू टाटा नॅनो ईव्हीजवळ दिसत आहेत. रतन टाटा यांना ही कार तर आवडलीच, पण त्यांनी कार चालवण्याचा आनंदही घेतला.
काही काळापूर्वी टाटा मोटर्सने टाटा नॅनोचं उत्पादन बंद केलं होतं. आता पुण्यातील इलेक्ट्रा ईव्ही कंपनीने याच नॅनो कारचं इलेक्ट्रिक व्हेरियंट तयार केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मंकीपॉक्सने जगाचं टेंशन वाढवलं, ‘ही’ लक्षणं आढळल्यावर वेळीच व्हा सावध!
“मी राज ठाकरेंना 2008 पासून शोधतोय, जर ते कधी भेटलेच तर…”
“6 व्या जागेची उद्या शिट्टी वाजेल, आम्ही निरोपाची वाट बघत नाही”
“…म्हणून या सरकारचं नाव जुम्मे के जुम्मे सरकार
‘तोपर्यंत आम्ही झोपणार नाही आणि झोपूही देणार नाही’; फडणवीस कडाडले